AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर

अतिथी देवो भवः म्हणजेच पाहुणे देवासारखे असतात. आपल्या देशात पाहुण्यांना आदर देण्याची प्रथा आहे. इंग्लंडच्या जनतेलाही अतिथी देवो भव: चा अर्थ समजून घेण्याची गरज आहे,

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 8:43 PM
Share

लंडन : अतिथी देवो भवः म्हणजेच पाहुणे देवासारखे असतात. आपल्या देशात पाहुण्यांना आदर देण्याची प्रथा आहे. इंग्लंडच्या जनतेलाही अतिथी देवो भव: चा अर्थ समजून घेण्याची गरज आहे, नाहीतर विराट कोहलीला ते समजावून सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. कारण इंग्लंडच्या चाहत्यांनी ज्या प्रकारचे कृत्य केले आहे. ते लज्जास्पद आहे. (ENG vs IND: England fans throws champagne corks at KL Rahul while fielding)

इंग्लंड टीमच्या पाठीराख्यांनी मैदानावर शॅम्पेनच्या बाटलीची झाकणं फेकण्यासारखे कृत्य केलं आहे, तेही लॉर्ड्सच्या मैदानावर. प्रेक्षकांनी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या केएल राहुलच्या दिशेने झाकणं फेकली. यानंतर कॅप्टन कोहलीनेदेखील रागात प्रेक्षकांना प्रत्युत्तर दिले. तसेच त्याने इशाऱ्याने राहुलला सांगितले की, ती झाकणं त्या प्रेक्षकांच्या दिशेने फेक.

नेमकं काय घडलं?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 69 व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. षटकाचा चौथा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी, जो रूटने बचावात्मक पद्धतीने चेंडू पुढे ढकलला. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीत बसलेले काही चाहते केएल राहुलच्या दिशेने शॅम्पेनच्या बाटलीची झाकणं फेकू लागले. राहुल थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करत होता. कॅप्टन कोहलीने लगेच राहुलला विचारले की काय झाले? दूर उभे राहून, राहुल हातवारे करत म्हणाला की, तिथे बसलेले प्रेक्षक बाटलीची झाकणं फेकत आहेत.

हे पाहून विराट कोहली रागाने लाल झाला. कर्णधार असे कृत्य कसे सहन करू शकतो? कोहली नेहमीच विरोधकांना उत्तरे देण्यासाठी ओळखला जातो आणि हे ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांपेक्षा चांगले कोणाला माहीत असणार. त्याने राहुलला हातवारे करुन सांगितलं की, ते प्रेक्षक जे काही फेकत आहेत. ते त्यांच्याकडे परत फेक. त्यानंतर जे काही होईल ते पाहून घेऊ.

नॉटिंगहॅममध्येही प्रेक्षकांकडून विराटला चिडवण्याचा प्रयत्न

दरम्यान, इंग्लिश चाहत्यांनी त्यांची मर्यादा ओलांडण्याची ही काही पहिली वेळ नाही. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या प्रेक्षकांनी कोहलीला डिवचण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला होता. कोहली सातत्याने डीआरएस घेण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे काही प्रेक्षक त्याच्याकडे डीआरएस सिग्नल दाखवत त्याला चिडवत होते.

इतर बातम्या

हार्दिक पांड्याकडून चौकार षटकारांचा पाऊस, आठव्या क्रमांकाला येऊन धडाकेबाज शतक, भारताच्या खास विजयाची कहाणी

बलाढ्य ऑस्‍ट्रेलियाचा संघ अवघ्या 65 धावांवर सर्वबाद, ‘या’ खेळाडूच्या नावावर बनला होता जबरदस्‍त वर्ल्‍ड रेकॉर्ड

जावई चांगला खेळला, के एल राहुलच्या धडाकेबाज शतकानंतर सुनील शेट्टीचं खास ट्विट

(ENG vs IND: England fans throws champagne corks at KL Rahul while fielding)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.