जावई चांगला खेळला, के एल राहुलच्या धडाकेबाज शतकानंतर सुनील शेट्टीचं खास ट्विट

खराब फॉर्ममुळे दोन वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर केएल राहुलने इंग्लंड दौऱ्यात दमदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतकानंतर आता त्याने शतकापर्यंत मजल मारली आहे.

जावई चांगला खेळला, के एल राहुलच्या धडाकेबाज शतकानंतर सुनील शेट्टीचं खास ट्विट
आथिया शेट्टी आणि के एल राहुल

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर असणारे भारतीय संघातील खेळाडू आपल्या पत्नी आणि मुलांसोबत त्याठिकाणी दिसून येत आहेत. तर ज्या खेळाडूंची अजून लग्न झालेली नाहीत ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत मोकळा वेळ घालवताना दिसत आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे केएल राहुल आणि आथिया शेट्टी. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाना हैरान करणारा केएल राहुल त्याची कथित गर्लफ्रेंड आथिया शेट्टीसोबत इंग्लंडमध्ये आहे. कथित यासाठी कारण आथिया आणि राहुल यांनी अधिकृतरित्या त्यांच्या रिलेशनबद्दल काहीच सांगितलेले नाही, मात्र मागील बऱ्याच काळापासून ते एकमेंकासोबत आहेत. दरम्यान आथियाही बॉलीवुड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. त्यामुळे राहुलच्या लॉर्ड्समधील ऐतिहासिक शतकानंतर सर्वच त्याचे कौतुक करत असताना सुनिल शेट्टीच्या ट्विटचा मात्र नेटकऱ्यांनी त्यांना हवा तोच भारी अर्थ काढला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने सलामीला येत अप्रतिम शतक झळकावलं आहे. राहुलच्या या शतकानंतर लॉर्ड्सवर शतक ठोकणारा तो नववा भारतीय बनला. ज्यामुळे सर्व देशभरातून त्याचं कौतुक होत आहे. अभिनेता सुनिल शेट्टीने देखील राहुलचे अभिनंदन करत ट्विट केलं. त्यात त्याने लिहिलं “क्रिकेटचा मक्का असणाऱ्या मैदानात शतक, भारी खेळलास बाबा.” या ट्वीटमध्ये सुनीलने प्रेमात केएल राहुलला  बाबा म्हणून संबोधलं आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दरम्यान सुनिलची मुलगी आथिया आणि राहुल दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या अनेक चर्चा असून त्यांच्या पोस्टमधून हे कायम दिसून येते. त्यामुळे सुनिलने राहुलचं अभिनंदन करताच नेटकऱ्यांनी सासऱ्याकडून जावयाचे अभिनंदन अशा प्रकारच्या कमेंट्सनी शेट्टीचा कमेंट बॉक्स भरुन टाकला.

हे ही वाचा

IND v ENG: खराब फॉर्ममुळे दोन वर्ष संघाबाहेर राहिलेल्या राहुलने रचला इतिहास, सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार नाव

IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

(After kl rahul smashes century at lords girlfriend athiya shettys father sunil shetty praise him with tweet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI