हार्दिक पांड्याकडून चौकार षटकारांचा पाऊस, आठव्या क्रमांकाला येऊन धडाकेबाज शतक, भारताच्या खास विजयाची कहाणी

आज हार्दिकच्या अशा खेळीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या सामन्यात त्याने आठव्या क्रमांकावर येऊन धडाकेबाज शतक ठोकलं आणि भारताला विजय मिळवून दिला.

हार्दिक पांड्याकडून चौकार षटकारांचा पाऊस, आठव्या क्रमांकाला येऊन धडाकेबाज शतक, भारताच्या खास विजयाची कहाणी
हार्दिक पांड्या

मुंबई : मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. वनडे आणि टी ट्वेन्टीमध्ये त्याने आपल्या कामगिरीने भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. आज हार्दिकच्या अशा खेळीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या सामन्यात त्याने आठव्या क्रमांकावर येऊन धडाकेबाज शतक ठोकलं आणि भारताला विजय मिळवून दिला. आज 14 ऑगस्ट… आजपासून बरोबर 4 वर्षांपूर्वी हार्दिकच्या बॅटिंगच्या जोरावर भारताने श्रीलंकेला पल्लेकल्ले टेस्टमध्ये धूळ चारली होती.. .!

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) दरम्यान 2017 मध्ये पल्लेकल्ले येथे 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान कसोटी सामना खेळला गेला. यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 487 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर शिखर धवनने 119 धावा केल्या, तर त्याचा सहकारी सलामीवीर केएल राहुलचं 15 धावांनी शतक हुकलं. तो 85 धावा करुन बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने 42 धावा केल्या. पण यानंतर आठव्या क्रमांकावर उतरल्यावर हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारत 108 धावांची अविस्मरणीय खेळी खेळली.

भारताने ‘असं’ मारलं मैदान…!

श्रीलंकेकडून दिनेश चंडीमलने सर्वाधिक 48 धावा केल्या तर यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेलाने 29 धावा केल्या. भारतीय संघासाठी फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक चार फलंदाजांना बाद केलं, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला प्रत्येकी दोन बळी मिळाले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंका संघाचा पहिला डाव केवळ 135 धावांपर्यंत पोहोचू शकला. श्रीलंकन संघाला फॉलोऑन खेळणे भाग पडले. दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेने पुढचा पाढा पंचावन्न असाच वाचला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 181 धावांवर बाद झाला. भारताने एक डाव आणि 171 धावांनी विजय मिळवला. यावेळी डिकवेला 41, चंडिमल 36 आणि अँजेलो मॅथ्यूजने 35 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून रविचंद्रन अश्विनने चार विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेतल्या. उमेश यादवने दोन विकेट घेतल्या.

(Indian Allrounder Hardik Pandya Hundred India beat Sri Lanka in pallekele test On this Day)

हे ही वाचा :

IND VS ENG : केएल राहुलचं ऐतिहासिक शतक, रोहितची झुंज, जाडेजाची चिवट खेळी, भारताची 364 धावांपर्यंत मजल

Lords Test : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडच्या खेळाडूची कमाल, सलामीच्या सामन्यात पटकावल्या आठ विकेट्स

धोनी पाठोपाठ हार्दीक पंड्याही नव्या हेअरकटमध्ये, फोटो पाहून पत्नी नताशाची ‘लव्हली’ कमेंट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI