IND VS ENG : केएल राहुलचं ऐतिहासिक शतक, रोहितची झुंज, जाडेजाची चिवट खेळी, भारताची 364 धावांपर्यंत मजल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 13, 2021 | 7:38 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. भारताचा पहिला डाव नुकताच संपला असून भारताने 364 धावापर्यंत मजल मारली आहे.

IND VS ENG : केएल राहुलचं ऐतिहासिक शतक, रोहितची झुंज, जाडेजाची चिवट खेळी, भारताची 364 धावांपर्यंत मजल
के एल राहुल

Follow us on

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. पण दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या कर्णधाराने मोठी चूक करत गोलंदाजी निवडली. ज्यानंतर भारताने तुफान फलंदाजी करत 364 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 127 धावा केल्याच. विशेष म्हणजे राहुलचं हे शतक लॉर्ड्सच्या मैदानातील पहिलं शतक असल्याने ते ऐतिहासिक ठरला आहे.

सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सुरुवातच उत्तम केली. दोघांनी एक भक्कम भागिदारी केल्यानंतर रोहित 83 धावांवर खेळत असताना जेम्स अँडरसनने त्याला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पुजारीही 9 धावा करुन बाद झाला. मग केएल राहुलने कोहलीच्या मदतीने शतक पूर्ण केलं. पण पहिल्या दिवसाखेर कोहली 42 धावा करुन बाद झाला. मग दुसऱ्या दिवशीची सुरुवात भारतासाठी खराब झाली. एक एक करत भारतीय फलंदाज बाद होत गेले. पण जाडेजाच्या 40 आणि पंतच्या 37 धावांच्या जोरावर भारताने 364 धावांपर्यंत मजल मारली. ज्यामुळे एक दिलासादायक स्कोर भारताने स्कोरबोर्डवर लागला आहे.

जेम्स अँडरसनचा पंच

इंग्लंडकडून पुन्हा एकदा त्यांचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच विकेट मिळवल्या. भारताचे सुरुवातीचे दोन महत्त्वाचे रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे विकेट घेतल्यानंतर अँडरसनने संपूर्ण सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्यानंतर रहाणेचा मोठा विकेट घेतल्यानंतर अखेरच्या फळीतील बुमराह आणि अँडरसनला बाद करत जेम्सने पाच विकेट मिळवल्या.

हे ही वाचा

आधी दमदार फलंदाजी, मग भेदक गोलंदाजी, इंग्लंडमध्ये ‘या’ खेळाडूने 5 चेंडूत घेतले 4 विकेट

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश 

(India vs England Test Series 2021 Live Score today India scored 364 runs in first innings at lords against England)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI