AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झालंय काय, कुठे चुकतात?, VVS लक्ष्मणने सांगितली ‘मिस्टेक’

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) गेल्या काही काळापासून सातत्याने अपयश येतंय. या सगळ्याचा दबाव घेऊन ते खेळत आहेत, असं मत भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मांडलं आहे.

पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झालंय काय, कुठे चुकतात?, VVS लक्ष्मणने सांगितली 'मिस्टेक'
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 9:45 AM
Share

मुंबई : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) गेल्या काही काळापासून सातत्याने अपयश येतंय. या सगळ्याचा दबाव घेऊन ते खेळत आहेत, असं मत भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मांडलं आहे. तसंच ते पुन्हा पुन्हा एकच चूक करत असल्याचंही लक्ष्मणने म्हटलं.

पुजारा आणि रहाणेला सातत्याने अपयश

रहाणे आणि पुजारा दोन्ही फलंदाजांना फलंदाजीमध्ये पाठीमागच्या काही महिन्यापासून मोठी खेळी खेळण्यात अपयश येतंय. त्या दोघांचं प्रदर्शन चमकदार होत नाहीय. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावानंतर त्यांच्या ढासळत्या परफॉर्मन्सनंतर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. पुजाराने ( Pujara)पहिल्या डावात 33 बॉलमध्ये 9 रन्स केले तर रहाणे पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

बाहेरच्या चर्चांवर पुजारा रहाणेने लक्ष देऊ नये

ईएसपीएन क्रिक इन्फोसोबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, “मला आशा आहे की बाहेरच्या आवाजावर आणि चर्चांवर पुजारा आणि रहाणे लक्ष देत नसतील. लोकांना वाटतं की सिनियर खेळाडू दबाव झेलू शकतात. पण मला वाटतं अनुभवी खेळाडूंवरच दबाव जास्त असतो. प्रत्येक अयशस्वी खेळी आणि अपयश आपल्यावर दबाव वाढवत जातात”

तांत्रिक समस्या आणि रन्स करण्याची बैचेनी अजिंक्यच्या अपयशाचं कारण

रहाणेच्या अपयशावर बोलताना लक्ष्मण म्हणाला, “तांत्रिक समस्या आणि रन्स करण्याची बैचेनी हे त्याच्या अपयशाचं कारण आहे, असं मला वाटतं आपण ते नॉटिंगहॅमच्या पहिल्या डावातही पाहिले. तो क्रिजवर असताना खूप अस्वस्थ होता आणि शेवटी धावबाद झाला. ‘यापूर्वी तो धावबाद होण्यापासून वाचला होता. आजही मी त्याचं फुटवर्क पाहिले जे चांगलं नव्हतं. जेव्हा आपल्यात आत्मविश्वास कमी असतो, त्यावेळी असे प्रकार पाहायला मिळतात”, असं लक्ष्मण म्हणाला.

त्याच त्याच चुका अजिंक्य आणि चेतेश्वरकडून होतायत

पुढे बोलताना लक्ष्मण म्हणाला, “रहाणे आणि पुजारा या गोष्टीमुळे नाराज असतील की ते सारखं त्याच त्याच चुका पुन्हा करत आहेत. ज्यामुळे गेल्या काही महिन्यापासून ते सतत एकाच पद्धतीने आऊट होत आहेत. लक्ष्मणने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमध्ये रहाणेच्या बॉडी लँग्वेजबद्दल बोलताना आश्चर्य व्यक्त केलं. लक्ष्मणच्या मते, रहाणेने या मालिकेत नवीन मानसिकतेने जायला हवे होते आणि भूतकाळातील अपयश विसरुन जायला पाहिजे होतं.”

दिग्गजांकडून असं प्रदर्शन पाहावत नाही

जर लागोपाठ मालिकेत आपल्याला अपयश येत असेल किंवा चौथ्या पाचव्या टेस्टमध्ये मी अशा प्रकारची बॉडी लँग्वेज समजू शकतो पण सिरिजच्या सुरुवातीला अशा प्रकारची देहबोली बैचेन करणारी आहे. त्याच्या प्रतिभेला आणि अनुभवाला ती साजीशी नाही, असंही लक्ष्मण म्हणाला.

भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात तीन बाद 276 धावांपासून केली. केएल राहुल त्याच्या पहिल्या दिवसाच्या स्कोअरमध्ये केवळ दोन धावा जोडल्या. भारतीय संघ 364 धावांवर ऑल आऊट झाला. जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची किमया केली.

(india vs England 2nd Day Middle order Collapse Ajinkya Rahane And Cheteshawar Pujara lords VVS laxman)

हे ही वाचा :

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला; कोरोनाच्या भितीने केली चाचणी

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.