AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 26 एप्रिलला डबल हेडरमधील दुसर्‍या सामन्यात पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि दहाव्या स्थानी असणारे 2 संघ भिडणार आहेत.

LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?
LSG vs KKR Live StreamingImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 26, 2026 | 5:56 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत रविवारी 26 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 38 व्या सामन्यात आतापर्यंतचे 2 अपयशी संघ आमनेसामने असणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा एकूण आठवा सामना असणार आहे. लखनौने आतापर्यंत 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर केकेआरची लखनौपेक्षा वाईट अवस्था आहे. केकेआरला 7 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. केकेआरचा 1 सामना पावसाने वाया घालवला. तर केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. दोन्ही संघांचं इथून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. दोन्ही संघांचं आव्हान कायम आहे. मात्र त्यासाठी उर्वरित सामने हे मोठ्या फरकाने जिंकावे लागतील जे इतकं सोपं नाही.

केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मात्र यंदा अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात केकेआरला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे केकेआर अर्धा हंगाम संपल्यानंतर कमबॅक करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कॅप्टन्सीत लखनौने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता लखनौला आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही.

दोन्ही संघ कितव्या स्थानी

कोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये 3 गुणांसह सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्स नवव्या स्थानी आहे.

लखनौ-कोलकातापैकी सरस कोण?

लखनौ सुपर जायंट्सचा कोलकाता विरुद्ध दबदबा असल्याचं आकडे सांगतात. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये केकेआरला पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर कोलकाताने लखनौ विरुद्ध 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. आता उभयसंघातील आठव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सामन्याबाबत महत्वाची माहिती

दरम्यान लखनौ विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस जिंकून बॅटिंग/बॉलिंग कोण करणार हे निश्चित होईल.  हा सामना लखनौमधील श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल आणि स्मार्ट टीव्हीवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहता येणार आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर