बागेश्वर बाबाच्या ‘४ मुले जन्माला घाला’ वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांचा उद्देश…”
नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर बाबा म्हणून ओळख असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी समर्थकांना तसेच उपस्थितांना कथा सांगितल्या. या दरम्यान त्यांनी आरएसएसचे तोंडभरून कौतुक केले. इतकेच नाही, तर...
नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर बाबा म्हणून ओळख असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी समर्थकांना तसेच उपस्थितांना कथा सांगितल्या. या दरम्यान त्यांनी आरएसएसचे तोंडभरून कौतुक केले. इतकेच नाही, तर त्यांनी यानंतर केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडवली आहे.
बागेश्वर बाबा यांनी प्रत्येक हिंदूने चार मुलं जन्माला घालावी असं सांगितलं पुढे ते म्हणाले, पालकांनी प्रत्येकी एक मुल आरएसएसमध्ये पाठवावं. आरएसएस नेहमीच संकटकाळी नागरिकांच्या मदतीला येतं. या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, ‘साधू-संत त्यांची मतं मांडत असतात. त्यात वाद करण्याचा प्रश्न नाही, चार मुले जन्मला घालण्यावर त्यांचा उद्देश हिंदू संस्कतीच्या प्रसारात वाढ होणे असा होता.’
नागपूरमधील या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते.
Published on: Apr 25, 2026 03:12 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

