India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला चौथा धक्का, चॅपमनला बिश्नोईने पाठवलं तंबूत

India vs New Zealand T20I LIVE Cricket Score and Updates in Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मालिकेतील दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला चौथा धक्का, चॅपमनला बिश्नोईने पाठवलं तंबूत
| Updated on: Jan 25, 2026 | 7:56 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Jan 2026 07:56 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला चौथा धक्का, चॅपमनला बिश्नोईने पाठवलं तंबूत

    न्यूझीलंडला मार्क चॅपमनच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. चॅपमन आणि फिलीप जोडी जमली होती. त्यामुळे ही जोडी फोडणं आवश्यक होतं. हे काम रवि बिश्नोईने केलं. चॅपमनला टाकलेला चेंडू कळलाच नाही आणि  संजू सॅमसनच्या हाती झेल देत बाद झाला.

  • 25 Jan 2026 07:45 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: 10 षटकात न्यूझीलंडच्या 3 बाद 75 धावा, फिलिप-चॅपमनने डाव सावरला

    न्यूझीलंडला पावरप्लेमध्ये धक्का बसला होता. सहा षटकात 3 गडी गमवून 36 धावा केल्या होत्या. पण पुढच्या चार षटकात फिलिप-चॅपमन जोडीने डाव सावरला.  24 चेंडूत 39 धावांची खेळी केली. त्यामुळे दहा षटकात 3 गडी बाद 75 धावा केल्या आहेत.

  • 25 Jan 2026 07:30 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडच्या पावर प्लेमध्ये 3 बाद 36 धावा

    न्यूझीलंडने पावर प्लेच्या सहा षटकात 3 गडी गमवून 36 धावा केल्या. डेवॉन कॉनवे, टिम सेपयर्ट आणि रचिन रवींद्र स्वस्तात बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पावरप्लेमध्ये बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे धावगतीला खिळ लागली आहे.

  • 25 Jan 2026 07:27 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला तिसरा धक्का, सायपर्टला पहिल्याच चेंडूवर बुमराहचा दणका

    पावर प्लेचं शेवटचं षटक टाकण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवला. पहिल्याच चेंडूवर त्याने सायपर्टला क्लिन बोल्ड केलं. टिम सायफर्ट 11 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. सायपर्टच्या रूपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला.

  • 25 Jan 2026 07:11 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा धक्का, डेवॉन कॉनवेनंतर रचिन बाद

    न्यूझीलंडला रचिन रविंद्रच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. रचिन रविंद्रने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या रवि विश्नोईने त्याचा अप्रतिम झेल पकडला. रचिन रविंद्र 4 धावा करून बाद झाला.

  • 25 Jan 2026 07:04 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: न्यूझीलंडची पहिली विकेट, डेवॉन कॉनवे बाद

    डेवॉन कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. पहिल्याच षटकात डेवॉन कॉनवे फक्त 1 धाव करून बाद झाला आहे. हार्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने झेल पकडला. हार्षित राणाने त्याला पाचव्यांदा बाद केलं.

  • 25 Jan 2026 07:01 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Score: डेवॉन कॉनवे आणि टिम सायफर्ट जोडी मैदानात, पहिलं षटक हार्षित राणाला

    न्यूझीलंडकडून सलामीला डेवॉन कॉनवे आणि टिम सायफर्ट ही जोडी मैदानात उतरले आहेत. तर टीम इंडियाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी हार्षित राणा आला. न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे.

  • 25 Jan 2026 06:36 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडची प्लेइंग 11

    न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमीसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

  • 25 Jan 2026 06:35 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

  • 25 Jan 2026 06:34 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितलं की…

    मिचेल सँटनर म्हणाला की, मला वाटलं की आम्ही खूप चांगली फलंदाजी केली. मागच्या सामन्यातून शिकलेले धडे घ्या आणि ते या सामन्यात वापरा. ​​खूप लवकर पुढे जा. नीश खेळणार आहे.

  • 25 Jan 2026 06:33 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला…

    आपण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकेट चांगली दिसतेय, नंतर दव पडेल. निर्भय राहा, स्वतःचा निर्णय घ्या, आनंद घ्या आणि त्याच वेळी नम्र राहा. दोन बदल करण्यात आले आहेत. अर्शदीप आणि वरुण आज रात्री विश्रांती घेत आहेत. बुमराह आणि बिश्नोई यांना संधी मिळाली आहे.

  • 25 Jan 2026 06:31 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, गोलंदाजी घेत प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • 25 Jan 2026 05:33 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग 11

    न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग 11: टिम सेफर्ट, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जॅक.

  • 25 Jan 2026 05:32 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताची संभाव्य प्लेइंग 11

    भारताचे संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

  • 25 Jan 2026 05:31 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?

    दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या संघात पुनरागमनावर सर्वांचे लक्ष असेल. दुसऱ्या टी20 सामन्यात आराम दिल्याने वादाला फोडणी मिळाली होती.

  • 25 Jan 2026 05:01 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: न्यूझीलंडचा संपूर्ण संघ

    न्यूझीलंड संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर (कर्णधार), झकरी फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, काइल जेमिसन, मायकेल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, टिम रॉबिन्सन, बेव्हॉन जेकब्स.

  • 25 Jan 2026 05:00 PM (IST)

    India vs New Zealand T20I LIVE Update: भारताचा संपूर्ण संघ

    भारतीय संघ: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, श्रेयस अय्यर, जसप्रीत पटेल, जसप्रीत बुमराह

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना आज होत आहे. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. कारण भारताने यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकले असून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, भारताचं पारडं जड दिसत आहे.