IND vs NZ : अरे, असं कसं झालं? टीम इंडिया ढेपाळल्यानंतर कॅप्टन अय्यरही शॉक, ‘या’ एका गोष्टीवर फोडलं दारुण पराभवाचं खापर

Shreyas Iyer : कर्णधार म्हणून सामना जिंकून द्यायची जबाबदारी खरंतर श्रेयसवर होती, पण त्याला मोठा झटका मिळाला. संघातील कोणत्याच खेळाडूनं चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे भारत किवींविरुद्धच्या चौथ्या वनडेत पराभूत झाला आहे.

IND vs NZ : अरे, असं कसं झालं? टीम इंडिया ढेपाळल्यानंतर कॅप्टन अय्यरही शॉक, या एका गोष्टीवर फोडलं दारुण पराभवाचं खापर
सामना हल्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 3:15 PM

टीम इंडियाचा आज मोठा आणि दारुण पराभव झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील हा चौथा सामना होता. या सामन्यामध्ये संघाचं नेतृत्व हा श्रेयस अय्यर करत होता. कर्णधार शुबमन गिल याच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडिया मैदानात उतरली आणि किवींच्या जबरदस्त खेळीपुढे अख्खा संघ पत्त्यांसारखा कोसळला. या मालिकेमध्ये भारताने आधीच 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे एक सामना जिंकला की भारत मालिका जिंकणार आहे. त्यामुळे आता शेवटचा सामना जिंकणं गरजेच आहे.

या सामन्यात नेमकं काय घडलं याबद्दल सांगायचं झाल्यास पहिल्यांदा फलंदाजी करताना किवी संघाने तब्बल 333 धावा केल्या. या मोठ्या लक्षाचा पाठलाग करायला टीम इंडिया मैदाना उतरली असताना संघाचा डाव अतिशय डळमळित पाहायला मिळाला. प्रत्त्युत्तरात संघ केवळ 89 धावाचं करु शकला.

Loading...

रोहित, विराट, अय्यर हे भारताचे स्फोटक फलंदाज 10 धावाही करु शकले नाहीत. मॅट हेनरीने भारतीय फलंदाजी नेस्तनाबूत केली. त्याने आजच्या सर्व डावामध्ये केवळ 9.4 ओव्हर्समध्ये 27 धावा दिल्या आणि बदल्यामध्ये भारतीय संघाचे सहा विकेट उडवले.

दरम्यान, या दारुण पराभवानंतर आता कॅप्टन अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, पहिल्या आणि दुसऱ्या डावातील खेळपट्टीमध्ये लक्षणीय फरक होता. तो म्हणाला, असा पराभव पाहणे कठीण आहे. पण पहिल्या आणि दुसऱ्या डावातील खेळपट्टीमध्ये लक्षणीय फरक होता. मात्र, हेन्रीने योग्य ठिकाणी गोलंदाजी केली आणि त्याचे श्रेय त्यालाच जाते.

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे, असं वाटलेलं. पण दुसऱ्या डावात काहीतरी वेगळंच घडलं. खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होती पण आम्ही त्यांना ३३० धावा करताना पाहिले. साहजिकच, आमच्याकडून काही कॅच सुटले, पण सामन्यांमध्ये असे घडतेच. पण आम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेलो तेव्हा आम्हाला वाटले होते की आम्ही सहज जिंकू, मात्र ज्याप्रकारे चेंडू आत-बाहेर स्विंग होत होता, खेळपट्टी वेगळ्याच गोष्टी घडल्या. आम्ही चांगल्या चेंडूंवर आमच्या विकेट्स गमावल्या, ते सर्वच चांगले चेंडू होते. आता आम्हाला आता हा सामना विसरून जाऊन, आमच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये काय चुकले त्यावर काम करायचे आहे. आम्ही पुढच्या सामन्यात अधिक सकारात्मक मानसिकतेने उतरु.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us