India vs New zealand Toss result: नाणेफेकीत भारताच्या नशिबी पुन्हा निराशा, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत घेतली गोलंदाजी

टी20 विश्वचषकातील पहिला सामना गमावल्यानंतर आज दुसरा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

India vs New zealand Toss result: नाणेफेकीत भारताच्या नशिबी पुन्हा निराशा, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत घेतली गोलंदाजी
India vs New zealnd Toss
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 7:13 PM

T20 World Cup 2021 : भारत आणि न्यूझीलंड या सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आहे. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. यंदाच्या विश्वचषकात नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेऊन विजय लिहित आहे. पण ही संधी भारताला मिळत नसून पुन्हा एकदा टॉस विराटने गमावला आहे. आता प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला मैदानात उतरायचे आहे.

दोन्ही संघानी आपआपले पहिले सामने गमावले असल्याने आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यात नेट-रनरेटचा विचार करता दोघांनाही सेमी फायनलच्या एन्ट्रीसाठी आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं महत्त्वाचं आहे. दोन्ही संघानी आपले अंतिम 11 खेळाडूही जाहीर केले आहेत. यावेळी भारताने दोन महत्त्वाचे बदल केले असून सूर्यकुमारच्या जागी इशानला आणि भुवनेश्वरच्या जागी शार्दूलला संधी दिली आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.

हे ही वाचा :

India vs New Zealand T20 World Cup 2021: भारत आणि न्यूझीलंड संघासाठी करो या मरोची स्थिती, सामन्याला काही तासांतच सुरुवात

Video | न्यूझीलंडच्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीत दंग, इशान-ठाकूरचा डान्स, पंतकडून दिवाळी गिफ्ट

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’