IND vs NZ, WTC 2021 Match Prediction : विश्वविजेतेपदाची ‘कसोटी’, सामन्याचं काय चित्र असेल, विराट की केन? कोण कुणावर भारी? वाचा मॅच प्रेडिक्शन

| Updated on: Jun 18, 2021 | 7:04 AM

Today Match Prediction of WTC Final India vs New Zealand : आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाचा प्रोत्साहिनत करण्याची संधी समस्त भारतवासियांना मिळणार आहे.

IND vs NZ, WTC 2021 Match Prediction : विश्वविजेतेपदाची कसोटी, सामन्याचं काय चित्र असेल, विराट की केन? कोण कुणावर भारी? वाचा मॅच प्रेडिक्शन
विराट कोहली आणि केन विल्यमसन
Follow us on

मुंबई :  आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाचा प्रोत्साहिनत करण्याची संधी समस्त भारतवासियांना मिळणार आहे. आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात जगजेत्तेपदाची ‘कसोटी’ (WTC Final 2021) खेळविली जाणार आहे. पावसाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर सहाव्या दिवशीही रोमांच चालूच राहिल. कारण महामुकाबला तसा तगडा आहे. साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जगजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल. (India vs New Zealand WTC 2021 Match Prediction previvious match Stats 18 June in marathi)

साऊथॅम्प्टनवर इतिहास बदलावा लागेल

इतिहास घडवण्यासाठी काहीतरी नवं करावं लागतं. टीम इंडियाला साऊथॅम्प्टनमध्येही हेच करायचं आहे. इंग्लंड दौर्‍यावर जाणारी एकमेव टीम आहे भारतीय टीम जी साऊथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात नेहमीच पराभूत झाली आहे. 2014 च्या दौर्‍यावर टीम इंडिया प्रथमच साऊथॅम्प्टन मैदानावर खेळली. 2018 दौऱ्यावर पुन्हा याच मैदानावर खेळण्याचा अनुभव घेतला. पण दोन्ही वेळा इंग्लंडने भारतीय संघाला पराभवाची चाखायला लावली.

यावेळी टीम इंडियासमोर न्यूझीलंडचा संघ आहे. सामना कोणत्याही संघाच्या घरच्या मैदानावर नसून इंग्लंडच्या भूमीत होतो आहे. म्हणजेच खेळपट्टी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असेल. ज्यावर दोन्ही संघांचं वर्चस्व समान असेल. फक्त कोण खेळपट्टीवर कोणती जादू दाखवतो, हे पाहणं रंजक असेल. विराट आणि कंपनीला काहीही करुन ही लढाई, जिंकावीच लागणार आहे, त्याचवेळस त्यांनी घेतलेल्या 2 वर्षाच्या कष्टाचं चीज होईल. साऊथॅम्प्टनचा खराब इतिहास टीम इंडियाला बदलावा लागेल आणि विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला हरवून गोड विजयाचा स्वाद भारतवासियांना चाखायला देण्याचीसंधी विराटसेनेकडे आहे.

आतापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास

विश्वचषकातील कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने घरच्या मैदानावरील सिरीज जिंकून आपलं स्थान निश्चित केलं. त्याचबरोबर टीम इंडियाने घरच्या मैदानासह विदेशी भूमीतही कमाल केली. भारताने ऑस्ट्रेलियामध्येही इतिहास रचला. त्याआधी वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं. आता इंग्लंडच्या भूमीत न्यूझीलंडला पाणी पाजायची तयारी सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड कसोटी क्रिकेटमधील नंबर वनचा संघ बनला आहे. पण, आयसीसीच्या इव्हेंटमध्ये सर्वाधिक 5 वेळा डावाने विजय मिळवण्याचा विक्रम अद्यापही भारताच्या नावावर आहे.

आतापर्यंत भारतीय टीम किवींना भारी….!

विराट कोहलीच्या कर्णधारपद आकडा असो किंवा त्याचा एकंदर करिअरमधील विक्रम असो, दोन्ही बाबतीत टीम इंडियाची कामगिरी न्यूझीलंडपेक्षा उजवी आहे. कसोटी सामने खेळण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ आतापर्यंत 59 वेळा आमनेसामने आले आहेत. 21 वेळा भारताने सामना जिंकला. तर न्यूझीलंडला केवळ 12 वेळा विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर 26 सामने अनिर्णित राहिले आहेत.

जर आपण फक्त विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या कसोटीबद्दल बोललो तर दोन्ही संघ आतापर्यंत 5 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 3 वेळा विजय मिळवला, तर किवींनी 2 वेळा मैदाना मारलं.

आक्रमण करणार, साऊथॅम्प्टन जिंकणार

खेळ अॅटॅकिंग होईल. आक्रमण करणं ही रणनीती असेल, असं कर्णधार विराटने सांगितलंय. आता फक्त त्याच मानसिकतेने मैदानावर खेळून विजय मिळवत कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वविजेतेपदाची स्क्रिप्ट साऊथॅम्प्टनमध्ये लिहिली जावी, एवढीच काय ती इच्छा समस्त भारतवासियांची आहे.

(India vs New Zealand WTC 2021 Match Prediction previvious match Stats 18 June in marathi)

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल?, गांगुली म्हणतो, ‘या’ दोन खेळांडूवर सगळं अवलंबून

विराट, भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा : हरभजन सिंग

WTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?