AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल?, गांगुली म्हणतो, ‘या’ दोन खेळांडूवर सगळं अवलंबून

भारतीय संघाचा एक यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सौरव गांगुलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाला काही टीप्स दिल्या आहे. खासकरुन सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्माला गांगुलीने महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

WTC अंतिम सामन्याचा निकाल काय असेल?, गांगुली म्हणतो, 'या' दोन खेळांडूवर सगळं अवलंबून
Ganguly on WTC Final
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 5:58 PM
Share

मुंबई : कसोटी क्रिकेटमधील सर्वात मानाच्या सामन्याला 18 जूनपासून भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सुरुवात होणार आहे. भारताचे शिलेदार संपूर्ण सराव आणि दिग्गजांचे सल्ले घेऊन सामन्यांत न्यूझीलंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार, भारतीय क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) देखील टीम इंडियाला काही मोलाचे सल्ले दिले आहेत. पण त्याने दोन खेळाडूंवर सामना सर्वाधिक अवलंबून असल्याचं महत्त्वाचं विधान केलं आहे. गांगुली आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात बोलत होता. (Sourav Ganguly says Opener Rohit Sharma And Shubhman Gill Role is Important in ICC World Test Championship against New Zealand)

सलामीवीरांवर सामन्याची मदार

सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी एका मजबूत ओपनिंग भागिदारीची गरज असल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. परदेशात खेळताना भारतीय संघाकडून सलामीवीरांची जबाबदारी महत्त्वाची असते. याआधी वीरेंद्र सेहवाग होता जो ही कामगिरी चोख पार पाडायचा. त्यामुळे आता अनुभवी रोहित शर्मा आणि युवा फललंदाज शुभमन गिलने हे शिवधनुष्य पेलणे गरजेचे असल्याचं गांगुली म्हणाला. तसच या दोघांनी चांगला खेळ करत सुरुवात केल्यास पुढील फलंदाजानाही फलंदाजी करण सोपं जाईल असंही गांगुली म्हणाला.

प्रथम फलंदाजी मिळाल्यास फायदा

गांगुलीने परदेशी खेळपट्टीवर खेळताना तणाव असण साहजिकंच असल्याचं सांगितल. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी मिळाल्यास भारत मोठी धावसंख्या निर्माण करुन तणावमुक्त होऊ शकतो. असं गांगुली म्हणाला. तसंच मोठे आणि महत्त्वाचे सामने हे तणावाखालीच जिंकले जातात असंही गांगुली म्हणाला.

भारताकडे तगडी गोलंदाजी

भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ‘भारताकडे सध्या तगडे गोलंदाज आहे. भारताकडे सध्याचे गोलंदाज 20 विकेट्स घेण्याची ताकद ठेवतात. फक्त फलंदाजाना 300 ते 350 सारखे चांगले लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवण्याची गरज आहे.’

‘हा सामना विश्व चषकापेक्षा कमी नाही’

सौरव गांगुलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याटी विश्व चषकाशी तुलना केली आहे. गांगुली म्हणाला, ‘हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठी संधी आहे. विराटला इतक्या मोठ्या सामन्यात कर्णधारपद भूषवण्यास मिळत आहे यासाठी तो खूप आनंदी असेल. हा सामना म्हणजे कसोटी क्रिकेटंच विश्वचषकच असून दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने कोणताही संघ जिंकू शकतो. ‘
हे ही वाचा :

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.