भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर

भारतीय संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवतो असं विधान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर गंभीरने हे विधान केले आहे.

भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 2:19 PM

मुंबई : मागील दोन वर्षे म्हणजे 2019 पासून सुरु असलेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा (ICC World Test Chamoionship) आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZealand) या दोन्ही ताकदवर संघात उद्या म्हणजेच 18 जूनला अंतिम सामना (WTC Final) खेळवला जाईल. संपूर्ण भारत देश ‘टीम इंडिया जिंकूदे’ यासाठी प्रार्थना करत असताना ‘भारतीय संघ कुठेही जाऊन कुणालाही पराभूत करु शकतो’ असं विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने केलं आहे. गंभीरने आजतकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात हे विधान केलं. (India can beat any country in there Home ground says Former Cricketer Gautam Gambhir on Ocassion Of WTC Final)

गौतम गंभीर हा भारतीय संघाचा एक यशस्वी माजी फलंदाज असून त्याने 2007 च्या टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महत्त्वाची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. सध्या तो राजकारणात सक्रिय असून लोकसभेत भाजपचा खासदार आहे. राजकारणात सक्रीय असतानाही क्रिकेटच्या अनेक कार्यक्रमात गंभीर आवर्जून उपस्थित असतो. त्याने WTC Final च्या पार्श्वभूमीवरही भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी काही मोलाचे उपदेश दिले आहेत.

‘भारत केवळ जिंकण्यासाठी खेळतो’

भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, ‘भारताचा WTC च्या अंतिम सामन्यापर्यंत येण्याचा प्रवास सुंदर आहे. भारताने 17 सामन्यांत केवळ 4 सामने गमावलेत. त्यामुळे भारतीय संघ एखादी क्रिकेट मॅच खेळतो. त्यावेळी जिंकण्यासाठी खेळतो, ड्रॉ करण्यासाठी नाही. ड्रॉ हा दुसरा पर्याय असतो.’

‘इंग्लंडमधील परिस्थिती समजून खेळणे गरजेचे’

गौतम गंभीरने भारतीय संघाला अंतिम सामन्यात खेळण्यासाठी सल्ला देताना इंग्लंडमधील परिस्थितीचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. इंग्लंडमधील वातावरण तेथील खेळपट्टी वेगळी असल्याने खेळाडूंनी परिस्थिती समजून घेऊन खेळावे, असं गंभीर म्हणाला.

कर्णधाराची कामगिरी महत्त्वाची

गंभीरला तीन वेगळ्या फॉर्मेटसाठी तीन कर्णधार असावेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने ‘जर एकच कर्णधार तिन्ही फॉरमॅटमध्ये जिंकून देत असेल, तर प्रोब्लेम नाही. पण जर रिझल्ट मिळत नसतील तर मात्र बदलणे गरजेचे असे विधान केले. तसेच श्रीलंका दौऱ्यात (Sri lanka tour) शिखर धवनला (Shikhar Dhawan) कर्णधार निवडल्याने त्याच्या खेळाची कसोटी असेल असंही गंभीर म्हणाला.

गोलंदाजी भारतीय संघाची ताकद

पूर्वीपारपासून भारतीय संघाची मदार ही फलंदाजीवर असायची. फिरकीपटूंचा भरणा असलेल्या संघात आता वेगवान गोलंदाजही उदयास येत आहेत. त्यामुळे भारताच्या 15 खेळाडूंत्या संघात 5 वेगवान गोलंदाज असल्याने याता भारताला फायदा होईल आणि हीच भारताची ताकद असल्याचं गंभीर म्हणाला.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(India can beat any country in there Home ground says Former Cricketer Gautam Gambhir on Ocassion Of WTC Final)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.