AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार पण न्यूझीलंडला हलक्यात घेऊन चालणार नाही, स्पेशल मॅनचा भारतीय संघाला सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Final) भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारताकडे उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे खेळाडू असले तरी न्यूझीलंडला हलक्यात घेऊन चालणार नसल्याचं भारताच्या माजी दिग्गज खेळाडूनं म्हटलं आहे.

भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार पण न्यूझीलंडला हलक्यात घेऊन चालणार नाही, स्पेशल मॅनचा भारतीय संघाला सल्ला
विराट आणि केन
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 3:46 PM
Share

मुंबई : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला काही तासांतच सुरुवात होणार आहे. सामना खेळणाऱ्या भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन्ही संघासह सर्वच क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून सुरु असलेली WTC ही क्रिकेट जगतातील एक मोठी स्पर्धा असल्याने जगभरातील दिग्गज आणि क्रिकेट तज्ज्ञ आपली मत नोंदवत आहेत. भारताचा स्पेशल मॅन म्हणजेच माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) देखील भारताला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलं असलं तरी न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही असंही म्हटलं आहे. (India Have More Chances of Winning WTC Final But New Zealand is also Strong Team to Beat says VVS Laxman)

लक्ष्मणने आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. भारताचा संघ अनेक अडचणींचा सामना करुन मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहचलाय. त्यामुळे प्रत्येक बॉल जिंकण्याच्या हेतून खेळणं गरजेच आहे, असं लक्ष्मणने म्हटलं आहे. दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडू असल्यानं सामना चुरशीचा होईल असं लक्ष्मणंन म्हटलं आहे.

सलामीचा जोडी चांगली सुरुवात करेल

व्हीव्हीएस लक्ष्मण भारताच्या सलामी जोडीबद्दल म्हणाला, ‘भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) डावाची उत्तम सुरुवात करतील, अशी मला आशा आहे. दोघांकडेही उत्तम फलंदाजी करण्याची ताकद असून रोहितकडे अनुभुव आहे. तर गिलनेही ऑस्ट्रेलियाविरोधात चांगले पदार्पण केले आहे.’

न्यूझीलंडच्या संघात ताकदीचे खेळाडू

लक्ष्णणने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं. पण न्यूझीलंड संघाकडेही ताकदीचे खेळाडू असल्यानं त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही असंही तो म्हणाला. दोन्ही संघाकडे जागतिक दर्जाची बोलिंग आहे. त्यामुळे सामन्यात सुरुवातीचे 5-6 विकेट्स लगेच पडू शकतात. मात्र शेवटच्या फळीतील फलंदाजाना बाद करणंच भारतासाठी अवघड असल्याचं लक्ष्मणंने म्हटलं आहे. तसेच सामन्यात वापरण्यात येणारा ड्युक बॉल अधिक स्वींग होतो. त्यामुळे फिरकीपटूंना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचे रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्याकडे सामना जिंकवून देण्याचा मौका आहे असंही लक्ष्मण म्हणाला.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

WTC फायनल मॅचपूर्वी सचिनचा विराटला महत्त्वाचा सल्ला तर पुजाराबाबत केलं ‘हे’ विधान, काय म्हणाला क्रिकेटचा देव?

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(India Have More Chances of Winning WTC Final But New Zealand is also Strong Team to Beat says VVS Laxman)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.