AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान कोणता संघ जिंकणार यावर माजी खेळाडू युवराज सिंगने महत्त्वाचे विधान केले आहे.

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव
युवराज सिंग
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 11:37 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) सामन्याला सुरुवात होण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. या जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असणारे भारत (India) आणि न्यूझीलंड(NewZealand) हे संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघ तोडीस-तोड असल्याने विजयी कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यात भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने (Yuvraj Singh) सामन्यात कोणता संघ सरस ठरणार आणि विजय मिळवणार यावर आपलं मत नोंदवलं आहे. (Yuvraj Singh says India Have Strong Batting and Bowling so India Will Win Against New Zealand in WTC Final)

युवराजने भारताचा संघ दमदार असून विजयीश्री भारतच मिळवणार असं सांगितलं आहे. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही विभागात स्ट्राँग असल्याचे सांगत हा दावा केला आहे. युवराजने संघातील खेळाडू आणि त्याचे प्लस पॉईंट्सबाबत सांगत भारत विजयी होणार असा दावा केला आहे. युवराजने आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात हा दावा केला आहे.

भारताची बोलिंग न्यूझीलंडवर भारी

युवराजने भारताच्या जमेच्या बाजू सांगताना बोलिंग विभागाचा उल्लेख केला. भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजासह अनुभवी फिरकीपटू असल्याने भारताची बोलिंग न्यूझीलंडलवर भारी पडण्याची शक्यता युवीने वर्तविली आहे. अंतिम 15 मध्ये भारताने मोहम्मद शमी (Mohammad Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज(Mohammad Siraj), इशांत शर्मा(Ishant Sharma), उमेश यादव (Umesh Yadav) या फास्टर्ससह स्पिनर रवीचंद्रन आश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जाडेजाचा (Ravindra Jadeja) समावेश केला आहे. त्यामुळे भारतीय बोलिंगमध्ये विविधता असल्याने याचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे.

रोहितचा अनुभव तर शुभमनचा ‘यंग’ दम

भारताच्या सलामी जोडीबद्दल बोलताना युवी म्हणाला, ‘भारताचा सलामीवीर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) चांगला अनुभव आहे. तो न्यूझीलंडविरुद्धही बरेच सामने खेळला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा भारताला नक्कीच फायदा होईल. तर दुसरा सलामीवीर युवा फलंदाज शुभमन जरी नवखा असला तरी तो इंग्लंडच्या मैदानावर दम नक्की दाखवेल.’

मधली फळी विश्वासू

युवराज सिंग भारताच्या मधल्या फळीबद्दल बोलताना म्हणाला, ‘भारताकडे मधल्या फळीत विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत (Rishabh Pant), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) असे विश्वासू फलंदाज आहेत. त्यांनी मागील काही सामन्यात उत्तम कामगिरी दाखवल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे मधल्या फळीतील जबाबदारी हे फलंदाज यशस्वीपणे सांभाळतील.’

विराटसाठी चॅलेंज

भारताचा कर्णधार विराट कोहलीला युवराजने जपून खेळण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. सामन्यात वापरला जाणारा ड्युक बॉल सुरवातीला जास्त स्विंग करतो. त्यामुळे सर्व फलंदाजासह भारताचा कर्णधार विराटनेही जपून खेळण्याची गरज असल्याचं म्हणताना हेच विराटसाठी मोठं चॅलेंज असेल असंही तो म्हणाला.

हे ही वाचा :

WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं

WTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत!

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(Yuvraj Singh says India Have Strong Batting and Bowling so India Will Win Against New Zealand in WTC Final)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.