WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं

. भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीची प्रत्येक खेळपट्टीवर बॅट कशी तळपते, याचं गुपित सांगितलं आहे. (WTC Final 2021 Sunil Gavaskar Statement on Virat kohli Run On Every Pitch)

WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं
विराट कोहली

मुंबई : विराट कोहलीची (Virat Kohli) गणना आताच्या महान फलंदाजांमध्ये केली जाते. जर कोणता महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) रेकॉर्ड मोडू शकेल तर तो कोहलीच मोडू शकेल, अशी सातत्याने चर्चा होत असते. कोहली हा एक असा फलंदाज आहे जो प्रत्येक खेळपट्टीवर, प्रत्येक परिस्थितीत धावा करु शकतो. त्याच्या या शैलीच्या बळावर त्याची गणना महान फलंदाजांमध्ये होते. भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीची प्रत्येक खेळपट्टीवर बॅट कशी तळपते, याचं गुपित सांगितलं आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर असून भारताला पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध 18 जूनपासून आयसीसी कसोटी अजिंक्यपद आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (WTC Final 2021 Sunil Gavaskar Statement on Virat kohli Run On Every Pitch)

प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते?

एकदिवसीय क्रिकेटच्या प्रभावामुळे बऱ्याच वेळा फलंदाज उसळत्या चेंडू खेळण्याच्या फंदात पडतात. जेथे चेंडू स्विंग होत नाही, तिथे चालून जातं पण इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होते तिथे शरीराच्या जवळपास खेळणे आवश्यक असतं. सपाट खेळपट्ट्यांवर चेंडू येण्यासाठी विराट कोहली शेवटच्या क्षणापर्यंत थांबतो. यामुळेच तो प्रत्येक प्रकारच्या खेळपट्टीवर यशस्वी होतो, असं गुपित गावस्करांनी सांगितलं. ते पीटीआयशी बोलत बोलत होते.

ती एका महान फलंदाजाची निशाणी

भारतातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटच्या बॅटमधून शतक निघू शकलं नाही परंतु त्याने 60 धावांच्या खेळीत फिरकी गोलंदाजी कशी खेळायची हे त्याने दाखवून दिलं. त्याला कोणत्या प्रकारचा बॉल येणार आहे हे अगोदरच कळतं तिच एका महान फलंदाजाची निशाणी आहे.

आजकाल प्रत्येक दौऱ्यात एक किंवा दोन सराव सामने असतात. भारतीय खेळाडू आपापसात सराव सामने खेळत असत. या संघात तरूण आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे आणि बर्‍याच खेळाडूंनी बर्‍याच वेळा इंग्लंडचा दौरा केला आहे. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. भारताची तयारी पूर्ण झालीय, असं गावस्करांनी सांगितलं.

(WTC Final 2021 Sunil Gavaskar Statement on Virat kohli Run On Every Pitch)

हे ही वाचा :

WTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत!

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC WTC Final : फायनलला दोन दिवस उरले, न्यूझीलंडचा संघ पार्टीत मश्गुल, पार्टीचा Video

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI