WTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंची यादी जाहिर केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष सामन्यात खेळणाऱ्या 11 खेळाडूंची नाव ट्विट करत बीसीसीआयने जाहिर केली आहेत. (wtc final team india playing 11)

WTC final Team India Squad : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी विराटसेनेची घोषणा, 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?
Virat Shared Team India Photo
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 17, 2021 | 7:47 PM

मुंबई : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला काही तासांतच सुरुवात होणार आहे. सामना खेळणाऱ्या भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन्ही संघासह सर्वच क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंची यादी जाहिर केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष सामन्यात खेळणाऱ्या 11 खेळाडूंची नाव ट्विट करत बीसीसीआयने जाहिर केली आहेत. (WTC final Team India Playing xi Squad declared by BCCI WTC21 Final against New Zealand)

भारतीय संघात नेमकी साशंकता ही कोणते गोलंदाज खेळवणार याबद्दल होती. दरम्यान रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. सोबतच जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजाना सामावून घेतलं आहे.

टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार

भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.

शुभमन गिलला सलामीला खेळण्याची संधी

शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा, शुभमन गिल येण्याची शक्यता आहे तर त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिक्य रहाणे यांच्यावर असेल. रिषभ पंतचा विकेट कीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडची Playing 11 अद्यापही गुलदस्त्यात

भारतीय संघाने आपले 11 अंतिम खेळाडू जाहिर केले आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघ कोणत्या खेळाडूंना संधी देतो याकडे सर्वांचे लक्ष लागूल राहिले आहे. दरम्यान न्यूझीलंडने आपले 15 खेळाडू घोषित केले असले तरी अंतिम 11 खेळाडूंची यादी अजूनही जाहिर केलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंड नाणेफेकी दरम्यानच आपले अंतिम 11 खेळाडू घोषित करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या म्हणजेच 18 जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

हे ही वाचा :

(WTC final Team India Playing xi Squad declared by BCCI WTC21 Final against New Zealand)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें