India vs Pakistan T20 Live Streaming: आज पाकिस्तान विरुद्ध सामना तुम्ही कधी, कुठे, कसा पाहू शकता, जाणून घ्या सर्व डिटेल्स

India vs Pakistan T20 Live Streaming: आशिया कप (Asia cup) मध्ये दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार आहे. रविवारी दुबईच्या स्टेडियम मध्ये ही मॅच होईल. फायनल मध्ये जागा पक्की करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील.

India vs Pakistan T20 Live Streaming: आज पाकिस्तान विरुद्ध सामना तुम्ही कधी, कुठे, कसा पाहू शकता, जाणून घ्या सर्व डिटेल्स
India vs Pakistan
Image Credit source: social
| Updated on: Sep 04, 2022 | 7:32 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) मध्ये दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार आहे. रविवारी दुबईच्या स्टेडियम मध्ये ही मॅच होईल. फायनल मध्ये जागा पक्की करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. या सामन्याकडे फायनल आधीची रंगीत तालिम म्हणूनही पाहिलं जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ ग्रुप ए मध्ये होते. भारत पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत मागच्या रविवारी पहिल्यांदा दोन्ही संघ आमने-सामने आले. त्यावेळी भारताने पाकिस्तान धुळ चारली. टीम इंडियाने पाच विकेटने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. आशिया कपची सुपर 4 फेरी सुरु झाली आहे. सर्व संघ परस्पराविरुद्ध प्रयेकी एक सामना खेळणार आहेत.

विजय मिळवणं सोपं नव्हतं

भारतासाठी पहिला सामना जिंकणं सोपं नव्हतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी भारतासमोर विजयासाठी 148 धावांच लक्ष्य ठेवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्याने विजयात मोलाचं योगदान दिलं. विराट कोहलीने या सामन्यात 35 धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाने फलंदाजीत चमक दाखवली. पाकिस्तानकडून युवा गोलंदाज नसीम शाहने चांगला खेळ दाखवला.

भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि पाकिस्तानात आशिया कप 2022 चा सामना रविवारी 4 सप्टेंबरला खेळला जाईल.

भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?

भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.

भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?

भारत आणि पाकिस्तानात आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.

भारत-पाकिस्तान आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?

भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.

भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?

भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.