
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 19 व्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती. पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाने पाकिस्तानवर लो स्कोअरिंग सामन्यात जबरदस्त विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 120 धावांचा अप्रतिम बचाव केला. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या. टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.
टीम इंडियाने पाकिस्तानला सातवा झटका दिला आहे. इमाद वसीम 15 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. ऋषभ पंतने स्टंपमागे शानदार कॅच घेतला.
पाकिस्तानने सहावी विकेट गमावली आहे. जसप्रीत बुमराहने अर्शदीप सिंह याच्या हाती इफ्तिखार अहमद याला 5 धावांवर कॅच आऊट केलं.
हार्दिक पंड्याने शादाब खान याला विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. शादाबने 4 धावा केल्या. शादाब आऊट झाल्यानंतर सामना आणखी रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला चौथा झटका दिला आहे. बुमराहने मोहम्मद रिझवानला क्लिन बोल्ड केलं आहे. रिझवाने 44 बॉलमध्ये 31 धावा केल्या.
पाकिस्तानचा तिसरा गडी बाद करण्यात हार्दिक पांड्याला यश आलं आहे. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फटका मारताना फखर जमान चुकला आणि ऋषभ पंतच्या हाती झेल गेला.
उस्मान खान अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला आहे. पंचांनी नाबाद दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला आणि बाद असल्याचं घोषित केलं.
मोहम्मद रिझवानने बाबर आझम बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे. शिवम दुबेने रिझवानचा झेल सोडणं खूपच महागात पडलं आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानला पहिला धक्का दिला आहे. जसप्रीत बुमराह याने कॅप्टन बाबर आझम याला सूर्यकुमार यादव याच्या हाती 13 धावांवर कॅच आऊट केलं आहे.
पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं आहे.
नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांनी घेतलेल्या प्रत्येकी 3-3 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाचा डाव हा 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाकडून ऋषभ पंत याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. आता पाकिस्तान या 120 धावांचा यशस्वी पाठलाग करणार की टीम इंडिया बचाव करणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
टीम इंडियाने नववी विकेट गमावली आहे. जसप्रीत बुमराह गोल्डन डक ठरला आहे.
टीम इंडियाने आठवी विकेट गमावली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या 12 बॉलमध्ये 7 धावा करुन आऊट झाला आहे.
मोहम्मद आमीर याने 15 व्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या दोघांना आऊट करत टीम इंडियावर पूर्णपणे पकड मिळवली आहे. पंतने 42 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा गोल्डन डक ठरला.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. आपल्या कारकीर्दीतील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिवम दुबे अपयशी ठरला. शिवमने 9 बॉलमध्ये 3 धावा केल्या. नसीम शाह याने आपल्याच बॉलिंगवर शिवमला कॉट एन्ड बोल्ड केलं.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल याच्यानंतर आता सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्यकुमार यादव आयर्लंडनंतर आता पाकिस्तान विरुद्धही अपयशी ठरला आहे. सूर्या अवघी 1 धाव करुन आऊट झाला.
ऋषभ पंतने टीम इंडियाच्या डावातील दहाव्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार ठोकत हरिस रौफला झोडून काढला. टीम इंडियाने 10 ओव्हरनंतर 3 बाद 81 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल क्लिन बोल्ड झाला आहे. अक्षरने 18 बॉलमध्ये 20 धावा केल्या.
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. विराट कोहलीनंतर कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहित शर्मा 12 धावा करुन माघारी परतला आहे. टीम इंडियाची अशाप्रकारे सलामी जोडी माघारी परतली आहे.
टीम इंडियाने 12 धावांवर मोठी विकेट गमावली आहे. विराट कोहली चौकार ठोकल्यानंतर आऊट झाला आहे.
टीम इंडिया पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली आहे. सामन्याआधी एकूण 2 वेळा पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर टॉस झाला आणि सामन्याला सुरुवात झाली. मात्र 1 ओव्हरनंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा सामन्याला ब्रेक लागला आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याला अखेर पावसाच्या खोड्यानंतर 8 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आहे. तर पाकिस्तानकडून शाहिन शाह अफ्रिदी पहिली ओव्हर टाकत आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात टॉस पावसामुळे 30 मिनिटांच्या विलंबाने 8 वाजता झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय केला. मात्र टॉसनंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे आता 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणारा सामना आता 8 वाजून 50 मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यामुळे पावसाने एकूण 50 मिनिटांचा खेळ वाया घालवला आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. कॅप्टन बाबर आझम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला पहिले बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर पाकिस्तानने एकमेव बदल केला आहे. आझम खान याला विश्रांती देत इमाद वसीम याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबल्यात पावसामुळे 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र पावसामुळे विलंब झाला. त्यानंतर 7 वाजून 45 मिनिटांनी पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर आता 8 वाजता टॉस होणार आहे. तर 8 वाजून 30 मिनिटांनी पहिला बॉल टाकला जाणारआहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र ज्याची भीती तेच झालं. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. टॉसच्या आधी पावसाने एन्ट्री घेतली. मात्र त्यानंतर पाऊस थांबला. आता मिळालेल्या माहितीनुसार, 7 वाजून 45 मिनिटांनी पंच खेळपट्टीची पाहणी करणार आहेत.
पावसाच्या बॅटिंगमुळे टॉसला लेटमार्क
🚨 UPDATE 🚨
Toss delayed due to rain, the square remains under cover.
Stay Tuned for more updates ⌛️
Follow The Match ▶️ https://t.co/M81mEjp20F#T20WorldCup | #TeamIndia | #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकूण 12 सामने झाले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला 12 पैकी 8 सामन्यात लोळवलं आहे. तर पाकिस्तान फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे. तर दोन्ही संघांमध्ये एक सामना हा बरोबरीत सुटला. टीम इंडियाने तो सामना सुपर ओव्हरमध्ये आपल्या खिशात घातला. टीम इंडियाने अशाप्रकारे पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 9 वेळा विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावरुन टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची पाकिस्तान विरुद्ध गेल्या 4 डावांमधील धावांची आकडेवारी शेअर केली आहे. विराटचा ‘किंग’ उल्लेख करण्यात आला आहे.
The King Constant! 👑💪🏻#WhistleForBlue #INDvPAK 🥳🇮🇳@imVkohli pic.twitter.com/Vee62RgZlM
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 9, 2024
टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबल्याआधी रोहितसेनेच्या पलटणने जोरदार सराव केला. टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी जोरदार सराव केला. बीसीसीआयने सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टीम इंडियाचा जोरदार सराव, पाहा फोटो
— BCCI (@BCCI) June 8, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम: बाबर आझम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक खेळाडूने नेट्समध्ये घाम गाळला आहे. साऱ्या क्रिकेट विश्वाचं या सामन्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. या सामन्याला कधी सुरुवात होतेय, याची उत्सुकता लागून आहे.