
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील सुपर 4 च्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामना रिझर्व डे दिवशी म्हणजे आज सुरु झाला. या सामन्यात भारताच्या बॅट्समनकडून चांगले प्रदर्शन पहायला मिळाले. भारताच्या के.एल. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतकी खेळी केली आहे. बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर केएल राहुलने भारतीय संघात कमबॅक केलं. पाकिस्तानच्या बॉलर्सचा घाम काढतं त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतकं ठोकलं आहे.
भारताला गेले अनेक महिने मिडिल ऑरडरची चिंता सतावत होती. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत केएल राहुलने दमदार शतक ठोकलं आहे. कमबॅकनंतर पहिल्याचं सामन्यात केएल राहुलने शतक ठोकल्याने राहुल चांगल्याचं फॉर्म मध्ये असल्याचे पहायला मिळतं आहे. या शतकासह राहुलने वन डे करिअरमधील सहावं शतक पूर्ण केलं आहे. राहुल आणि विराटने चौथ्या नंबरसाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी केली आहे.
पठ्ठ्या फक्त फिटच नाही झाला तर त्याने क्लास काय असतो हे दाखवून दिलं आहे. आजच्या दिवसाला तोडफोड फलंदाजी करायला खरी राहुलनेच सुरूवात केली. विराट सुरूवातीला थोडा सावकाश खेळत होता सामना शेवटला जाताच त्यानेही आकर्षक शॉट्स खेळत शतक पूर्ण केलं. केएल राहुलच्या या दमदार खेळीने भारतीय संघाची मिडिल ऑरडरची चिंता आता दूर झाली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रॉफ.