
ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला भारताने 6 धावांनी पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तान सुरुवातीपासूनच चांगल्या स्थितीत होता. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी अशी शानदार कामगिरी केली की पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता फक्त २ टक्के होती. तर पाकिस्तानच्या विजयाची शक्यता ९८ टक्के होती. तरी देखील भारतीय संघाने पुनरागमन केले की पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. सामना टीम इंडियाच्या हाताबाहेर गेला होता. न्यूयॉर्कच्या स्टेडिअमवर भारतीय चाहते निराश झाले होते. पण गोलंदाजांनी निराश केले नाही.
आता या सामन्याशी संबंधित नवीन व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान कादिरच्या पत्नीचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडू लागली आहे. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान कादिरची पत्नी सोबिया हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उरुज जावेद नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत असेल लिहिले आहे की, ‘निर्लज्ज लोकांनी आपल्याच वहिनीला रडवले.’ भारताविरुद्ध पराभवा होण्याआधी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला अमेरिकेने देखील पराभूत केले आहे. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अमेरिकेविरुद्ध पराभव झाला. दोन्ही सामन्यात पाकिस्तान जिंकण्याच्या स्थितीत होता, पण दोन्ही वेळा पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला.
उस्मान कादिरने पाकिस्तानसाठी एक एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. उस्मानने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये, तो पाकिस्तानच्या आशियाई क्रीडा संघाचा भाग होता. उस्मानने एक वनडे आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
Be sharmo ne apni bhabhi ko hi rula diya 😭#T20WorldCup2024 #INDvsPAK pic.twitter.com/XNAKtD0PLB
— Urooj Jawed🇵🇰 (@uroojjawed12) June 11, 2024
पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या लोकांनीच त्यांच्या टीमला भरपूर ट्रोल केले आहे. भारत-पाकिस्तान सामना हा जगभरातील सर्वात उत्सूकतेचा सामना म्हणून पाहिला जातो. दोन्ही संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. पण भारताने बहुतेक वेळा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे.