Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’

| Updated on: Dec 26, 2021 | 5:11 PM

ढगाळ वातावरण, खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि समोर रबाडा, लुंगी निगीडीसारखे भेदक गोलंदाज. कुठल्याही फलंदाजासाठी या आव्हानांचा सामना करण सोप नाहीय.

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’
Follow us on

सेंच्युरियन: ढगाळ वातावरण, खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि समोर रबाडा, लुंगी निगीडीसारखे भेदक गोलंदाज. कुठल्याही फलंदाजासाठी या आव्हानांचा सामना करण सोप नाहीय. पण भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank agarwal) अत्यंत सहजतेने या परिस्थितीला सामोरा गेला व सेंच्युरियन कसोटीच्या पहिला डावात अर्धशतक झळकावलं. मयांकने 89 चेंडूंचा सामना करत करीअरमधील सहावे अर्धशतक झळकावले. या हाफ-सेंच्युरीच्या खेळीत त्याने शानदार आठ चौकारही लगावले.

मयांकचे हे अर्धशतक दक्षिण आफ्रिकन संघाला चांगलचं झोंबल असेल, कारण तो 36 धावांवर खेळत असताना विकेटकिपर क्विंटन डिकॉकने मयांकचा सोपा झेल सोडला. मार्को जॅनसेनच्या सुंदर आऊट स्विंगने मयांकच्या बॅटची कड घेतली होती. पण डिकॉकला हा झेल पकडता आला नाही. मयांकने या संधीचा फायदा उचलत चौकार ठोकून अर्धशतक झळकावले.

मयंक अग्रवालची ‘हॅट्रिक’
मयांकने अर्धशतक झळकावत आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने सलग तीन कसोटी डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मयांकने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत 150 धावांची शतकी आणि 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती.

मयांकसाठी अर्धशतक खास
मयांक अग्रवालसाठी सेंच्युरियनमधलं हे अर्धशतक खास आहे. कारण मयांकने आजच्याच दिवशी 2018 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. परदेशातील खेलपट्ट्यांवर मयांकच्या बॅटमधून धावा आटतात. त्यामुळेच हे अर्धशतक त्याच्यासाठी खास आहे. मयांकला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली होती. पण त्यावेळी त्याला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आज मात्र मयांकने निर्धाराने फलंदाजी केली.