IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट, केपटाऊन टेस्टमध्ये हे दोन मोठे बदल होऊ शकतात

| Updated on: Jan 10, 2022 | 11:05 AM

खरंतर या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरकडून बरचं काही शिकण्यासारख आहे. कारण जोहान्सबर्ग कसोटीत त्याला बॉल शेकले. पण पठ्ठयाने हार मानली नाही.

IND vs SA: टीम इंडियाच्या प्लेइंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट, केपटाऊन टेस्टमध्ये हे दोन मोठे बदल होऊ शकतात
Follow us on

डरबन : केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर उद्या मालिकेतील शेवटच्या निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने सेंच्युरियनचा पहिला तर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गचा दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. त्यामुळे केपटाऊनची कसोटी मालिकेचा निकाल निश्चित करेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून फलंदाजी भारतीय संघाची डोकेदुखी ठरली आहे. पहिल्या कसोटीत लोकेश राहुलचे शतक आणि मयंक अग्रवालचे अर्धशतक याचा अपवाद वगळता भारताचे टॉप फलंदाज या मालिकेत विशेष चमक दाखवू शकलेले नाहीत. (India vs south Africa Capetown 3 rd test Two changes could be possible)

एल्गरकडून शिकण्याची गरज
संघाला गरज असताना खेळपट्टीवर ठाण मांडण्याऐवजी त्यांनी विकेट बहाल केल्या. खरंतर या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरकडून बरचं काही शिकण्यासारख आहे. कारण जोहान्सबर्ग कसोटीत त्याला बॉल शेकले. पण पठ्ठयाने हार मानली नाही. त्याने आपल्या संघाची नौका किनाऱ्याला लावली. त्यामुळे विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत यांना आता नावाप्रमाणे खेळ दाखवावा लागेल.

दुखापतीमुळे होणार बदल
उद्याच्या निर्णायक केपटाऊन कसोटीत दोन बदल होऊ शकतात. या दोन्ही बदलांचे कारण दुखापतच आहे. जोहान्सबर्ग कसोटीत पाठिच्या दुखण्यामुळे विराट कोहली खेळू शकला नव्हता. तो तिसऱ्या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे. तो संघात परतल्यानंतर चांगली कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीला संघाबाहेर बसावे लागेल.

गोलंदाजांमध्ये कोणाला संधी?
त्यानंतर दुसरा बदल गोलंदाजीमध्ये होईल. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाली होती. हॅमस्ट्रिंगच्या या दुखापतीमधून तो अजून सावरलेला नाही. त्यामुळे सिराजच्या जागी इशांत शर्माला संधी दिली जाऊ शकते. इशांतला उमेश यादवकडून स्पर्धा आहे. पण इशांत शर्माकडे 100 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने 300 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आधी इशांत शर्माची शार्दुल ठाकूर बरोबर स्पर्धा होती. पहिल्या कसोटीत शार्दुल विशेष काही करु शकला नव्हता. त्यामुळे इशांत शर्माला संधी देण्याची मागणी होत होती. पण दुसऱ्या कसोटीत शार्दुलने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन केलं व आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत शार्दुल खेळणार हे निश्चित आहे.

संबंधित बातम्या:

Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश
IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल
U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम

(India vs south Africa Capetown 3 rd test Two changes could be possible)