IND vs SA: न्यू इयर गिफ्ट, सेंच्युरियनवर भारताने मिळवला ऐतिहासिक कसोटी विजय

आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही.

IND vs SA: न्यू इयर गिफ्ट, सेंच्युरियनवर भारताने मिळवला ऐतिहासिक कसोटी विजय
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 4:33 PM

सेंच्युरियन: सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर संपुष्टात आला. भारताने 113  धावांनी विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. (India vs South Africa India Registered historic win at centrurion beat south Africa by runs)

काल चौथ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद 94 धावा झाल्या होत्या. आज कसोटीचा पाचवा आणि अखेरचा दिवस होता. आज सकाळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाला पुढे सुरुवात केली. कर्णधार डीन एल्गर आणि टेंबा बावुमाने सकारात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. एल्गर खेळपट्टीवर असेपर्यंत भारताच्या विजयाबद्दल थोडी धाकधूक वाटत होती. पण जसप्रीत बुमराहने त्याला 77 धावांवर पायचीत पकडून भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या क्विंटन डि कॉकचा अडसर मोहम्मद सिराजने दूर केला. सिराने 21 धावांवर डिकॉकला क्लीन बोल्ड केले. सेंच्युरियनच्या या पीचवर 305 धावांचे लक्ष्य इतके सोपे नव्हते. आतापर्यंतचा सेंच्युरियनचा इतिहास पाहिला तर कुठलाही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. सेंच्युरियनच्या या विकेटवर गोलंदाज धाक ठेवतील अशी स्थिती होती. कारण चेंडूला मध्येच उसळी मिळतेय, तर कधी चेंडू खाली राहत होता. दुसऱ्या डावात भारताकडून बुमराह, शामी आणि सिराजने भेदक मारा केला. बुमराह-शामीने प्रत्येकी तीन तर सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या: 

सचिन, सेहवाग मैदानात परतणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना
आमदार लाड सपत्नीक ‘शिवतीर्थ’वर, गप्पा संपेना, शर्मिला वहिनी दारापर्यंत सोडायला
Governor Vs CM : हेच ते मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र, जे कोश्यारींनी ‘अपमानजनक आणि धमकावणारं’ असल्याचं कडक शब्दात सांगितलं

(India vs South Africa India Registered historic win at centrurion beat south Africa by runs)