IND vs SA: अंपायरकडून मोठी चूक, शार्दुल ठाकूरने टाकलं सात चेंडूंच षटक

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारतीय गोलंदाज पीचवर घाम गाळत असतानाच, पंचांनी एक चूक केली.

IND vs SA: अंपायरकडून मोठी चूक, शार्दुल ठाकूरने टाकलं सात चेंडूंच षटक
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 9:07 PM

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनमध्ये (Capetwon test) सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने धारदार गोलंदाजी करुन भारताचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आणला होता. दुसऱ्यादिवशी भारतीय गोलंदाजांनी पलटवार केला व यजमान संघाला खेळपट्टीवर टीकण्याची संधीच दिली नाही. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारतीय गोलंदाज पीचवर घाम गाळत असतानाच, पंचांनी एक चूक केली.

50 व्या षटकात चूक

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 50 व्या षटकात ही चूक झाली. शार्दुल ठाकूर हे षटक टाकत होता. या षटकात भारताला पाच धावांची पेनल्टी लागली तेच पंचांच्या चुकीमुळे शार्दुलच्या एका षटकात सहा ऐवजी सात चेंडू टाकावे लागले. विराटने शार्दुलकडे चेंडू सोपवला. शार्दुलने गोलंदाजी करताना त्या षटकात सात धावा दिल्या आणि या षटकात सहा ऐवजी सात चेंडू टाकले.

म्हणून पाच धावांची पेनल्टी

या षटकात शार्दुलचा एका सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये गेला. पहिल्या स्लीपमध्ये पुजारा उभा होता. त्याला ही कॅच पकडता आली नाही. खरंतर त्यावेळी टीम इंडियाला विकेटची आवश्यकता होती. झेल सुटला आणि चेंडू विकेटकिपरच्या हेल्मेटला जाऊन लागला. ऋषभने ते हेल्मेट मैदानात मागे ठेवले होते. या हेल्मेटमुळे भारताला पेनल्टी लागली आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात अतिरिक्त पाच धावा जमा झाल्या.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.