IND vs SL: दिवस फिरले! यशस्वी गोलंदाज पण सिलेक्शन कमिटीच्या बैठकीत त्याच्या नावाची साधी चर्चाही नाही

| Updated on: Dec 28, 2022 | 4:10 PM

IND vs SL: टीम इंडियासाठी तो भरपूर खेळला. टीमला विजय मिळवून दिले. पण काल निवड समितीच्या बैठकीत त्याच्या नावाची साधी चर्चाही झाली नाही.

IND vs SL: दिवस फिरले! यशस्वी गोलंदाज पण सिलेक्शन कमिटीच्या बैठकीत त्याच्या नावाची साधी चर्चाही नाही
Team India
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीजसाठी काल टीम निवडण्यात आली. या संघ निवडीनंतर काही खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दोघांना वनडे आणि टी 20 दोन्ही टीममध्ये जागा मिळालेली नाही. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीच्या मीटिंगमध्ये भुवनेश्वर कुमारच्या नावावर साधी चर्चा सुद्धा झाली नसल्याची माहिती आहे. असं झालं असल्यास, बीसीसीआयचा भुवनेश्वरवरुन विश्वास उडाल्याच स्पष्ट होतं.

T20 मध्ये दोन नवीन वेगवान गोलंदाज

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजांना संधी दिलीय. दुसऱ्याबाजूला टी 20 सीरीजमध्ये अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमारची निवड झालीय. भुवीला दोन्ही टीम्समध्ये स्थान मिळालेलं नाही.

हे वर्ष तसं खास नव्हतं

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, टीम निवडीसाठी बैठक झाली. त्यात भुवनेश्वर कुमारच्या नावावर कुठलीही चर्चा झाली नाही. यावरुन भुवनेश्वर यापुढच्या बीसीसीायच्या प्लानचा भाग नसेल, असं दिसतय. भुवनेश्वरसाठी हे वर्ष तसं खास नव्हतं. इंजरीनंतर त्याला टी 20 टीममध्ये स्थान मिळालं. पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. याचवर्षी झालेल्या आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपमधील त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं.

वर्ल्ड कपमध्ये किती विकेट काढल्या?

वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वरला फक्त चार विकेट मिळाल्या. न्यूझीलंड विरुद्ध तो दोन टी 20 सामने खेळला. पण एकच विकेट त्याला मिळाला. या प्रदर्शनानंतर भुवनेश्वरला डच्चू मिळेल अशी चर्चा होती. आता घडलं सुद्धा तसचं.

वनडे टीममधूनही बऱ्याच काळापासून बाहेर

यावर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज झाली. या मालिकेत भुवनेश्वर कुमार शेवटचा वनडे सामना खेळला. तेव्हापासूनच तो वनडे टीमबाहेर आहे. 32 वर्षाच्या भुवनेश्वरने 2021 साली वनडे फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमार टीम इंडियाकडून एकूण 87 टी 20 सामने खेळला. यामध्ये त्याने 90 पेक्षा जास्त विकेट काढल्या. बीसीसीआयला आता भुवनेश्वरवर तितका विश्वास राहिलेला नाही.