IND vs WI Test Series | पाचव्या गोलंदाजाच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये स्पर्धा, विंडिज विरुद्ध पहिली कसोटी

IND vs WI Test Series | भविष्यातील टीम बांधणी हा वेस्ट इंडिज दौऱ्यामागे उद्देश आहे. सिनियर आणि युवा खेळाडूंचा ताळमेळ पहिल्या कसोटी सामन्यात दिसू शकतो.

IND vs WI Test Series | पाचव्या गोलंदाजाच्या जागेसाठी या तिघांमध्ये स्पर्धा, विंडिज विरुद्ध पहिली कसोटी
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2023 | 1:07 PM

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. डॉमिनिका येथे टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. टीम इंडियाने या सीरीजसाठी अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. भविष्यातील टीम बांधणी हा वेस्ट इंडिज दौऱ्यामागे उद्देश आहे. सिनियर आणि युवा खेळाडूंचा ताळमेळ पहिल्या कसोटी सामन्यात दिसू शकतो. पण पहिल्या कसोटीसाठी टीम निवड सोपी नाहीय.

हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यासमोर पाचव्या गोलंदाजाची निवड हा पेच असणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलला सुरुवात करणार आहे.

खेळपट्टी कशी असेल?

वेस्ट इंडिजच्या सबिना पार्क किंवा केनसिंगटॉन ओव्हल सारखी डॉमिनिकाच्या विंडसॉर पार्क खेळपट्टीबद्दल फार माहिती नाहीय. विंडसॉर पार्कवर फक्त पाच कसोटी, चार वनडे आणि चार T20 सामने झालेत. त्यामुळे तिथली खेळपट्टी कशा प्रकारची असेल, या बद्दल ठामपणे अंदाज बांधता येणार नाही.

पाकिस्तानने इथे किती दिवसात जिंकलेला कसोटी सामना?

विंडसॉर पार्कवर झालेल्या पाच पैकी वेस्ट इंडिजने फक्त एका कसोटी सामन्यात विजय मिळवला. तो ही झिम्बाब्वे विरुद्ध. त्यामुळे इथला इतिहास वेस्ट इंडिजला अनुकूल नाहीय. 2017 मध्ये पाकिस्तानने इथे कसोटी सामना जिंकला होता. तीन दिवसात हा कसोटी सामना निकाली निघाला होता.

टीम इंडियाच्या कुठल्या 3 बॉलर्समध्ये स्पर्धा?

पहिल्या कसोटी सामन्यासाठी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोणाला निवडायच? हा द्रविड-रोहित जोडीसमोर प्रश्न आहे. जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी या तिघांमध्ये स्पर्धा आहे. पाकिस्तानकडून वेस्ट इंडिज विरुद्धच्या या कसोटी सामन्यात मोहम्मद अमीर, हसन आणि मोहम्मद अब्बासने मिळून 11 विकेट काढले होते. यासिर शाहच्या लेगस्पिन बॉलिंगने 9 विकेट घेतल्या होत्या.

हमखास संधी कोणाला मिळणार?

टीम इंडियाची मॅनेजमेंट या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या आपल्या दोन्ही तज्ज्ञ स्पिनर्सना संधी देईल. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या साथीला ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर असेल. त्यामुळे पाचव्या आणि तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी तिघांमध्ये स्पर्धा आहे. तिघांची स्वतंत्र गुणवैशिष्ट्य आहेत. त्यामुळे तिघांमधून एकाची निवड करणं सोपं नसेल.