IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्या आऊट, टीम इंडियाला तिसरा झटका, सामना पुन्हा बरोबरीत

India vs West Indies, T20 world Cup 2026 Live Score Updates: कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. उभयसंघातील हा सामना एकाप्रकारे व्हर्च्युअल क्वार्टर फायलन आहे.

IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्या आऊट, टीम इंडियाला तिसरा झटका, सामना पुन्हा बरोबरीत
India vs West Indies Super 8 Live Score Updates
Image Credit source: Tv9
| Updated on: Mar 01, 2026 | 9:57 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 01 Mar 2026 09:57 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्या आऊट, टीम इंडियाला तिसरा झटका, सामना पुन्हा बरोबरीत

    वेस्ट इंडिजने टीम इंडियाला तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 16 बॉलमध्ये 18 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला आहे. शामर जोसेफ याने सूर्याची विकेट मिळवली.

  • 01 Mar 2026 09:55 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : दबाव ते दबदबा, संजूचा धमाका, निर्णायक सामन्यात विंडीज

    टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या निर्णायक सामन्यात 196 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त अर्धशतक झळकावलं आहे. संजूने अवघ्या 26 बॉलमध्ये अर्धशतक झळकावत टीकाकारांना चोख उत्तर दिलंय.

  • 01 Mar 2026 09:42 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : संजू-सूर्या जोडी जमली, टीम इंडिया शतकाच्या दिशेने

    वेस्ट इंडिजने  196 धावांचा पाठलाग करताना संयमी सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला ठराविक अंतराने 2 झटके दिले. अभिषेक शर्मा आणि इशान किशन दोघांनी प्रत्येकी 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाची 2 आऊट 41 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर ओपनर संजू सॅमसन आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या जोडीने टीम इंडियाला 8 ओव्हरपर्यंत 2 आऊट 78 रन्सपर्यंत पोहचवलं आहे.

  • 01 Mar 2026 09:28 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : अभिषेकनंतर इशान किशन आऊट, टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात

    वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. अभिषेक शर्मा याच्यानंतर इशान किशन आऊट झाला आहे. इशान किशन याने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे भारताची 4.3 ओव्हरमध्ये 2 आऊट 41 अशी स्थिती झाली आहे.

  • 01 Mar 2026 09:16 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : अभिषेकने लावलंय काय? ओपनर पुन्हा फ्लॉप, टीम इंडियाला पहिला झटका

    अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीने 196 धावांचा पाठलाग करताना संयमी सुरुवात केली. संजू सॅमसन याने तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारत टीम इंडियाला वेग मिळवून दिला. मात्र अभिषेक शर्मा याने फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावली. अभिषेकने यासह निराशा केली. अभिषेकने 11 बॉलमध्ये 10 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 01 Mar 2026 09:02 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : संजू-अभिषेक सलामी जोडी मैदानात, टीम इंडियासमोर 196 रन्सचं टार्गेट, विंडीज जिंकणार?

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली आहे. विंडीजने टीम इंडियासमोर 196 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 01 Mar 2026 08:50 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियासमोर 196 रन्सचं टार्गेट, विंडीज जिंकणार?

    वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडियासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजच्या 6 फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग करत टीमला 200 धावांच्या जवळ पोहचवलं. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत सेमी फायनलचं तिकीट मिळवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

     

  • 01 Mar 2026 08:44 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : अर्शदीपची चिवट बॉलिंग, विंडीजच्या जोडीला फटकेबाजीपासून रोखलं

    अर्शदीप सिंह याने 19 व्या ओव्हरमध्ये चिवट बॉलिंग करत विंडीजच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. अर्शदीपने जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल या दोघांसमोर 19 व्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावाच दिल्या.

  • 01 Mar 2026 08:28 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : विंडीज मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, पॉवेल-होल्डर स्फोटक जोडी मैदानात

    वेस्ट इंडिजने 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 149 धावा केल्यआ आगहेत.  रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर ही स्फोटक जोडी मैदानात खेळत आहेत. रोवमन 20 आणि होल्डर 7 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 01 Mar 2026 08:19 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : विंडीजला चौथा झटका, शेरफेन रुदरफोर्ड आऊट

    टीम इंडियाने विंडीजला चौथा झटका दिला आहे. हार्दिक पंड्या याने शेरफेन रुदर्फोड याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत वैयक्तिक पहिलीच विकेट मिळवली आहे. शेरफेनने 9 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.

  • 01 Mar 2026 08:03 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : बुमराह जबरदस्त, एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, सेट जोडी माघारी

    टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कमाल केली आहे. बुमराहने एकाच ओव्हरमध्ये  2 विकेट्स घेत विंडीजच्या सेट जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. बुमराहने शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेज या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हेटमायर 27 आणि चेज 40 रन्स करुन आऊट झाले.

  • 01 Mar 2026 07:58 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : हेटमायर-चेज जोडीचा धमाका, विंडीज मजबूत स्थितीत

    शाई होप आऊट झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेज या जोडीेने फटकेबाजी करत विंडीजला पुन्हा चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आहे. विंडीजने 11 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 99 धावा केल्या आहेत. हेटमायर 25 तर रोस्टन चेज 39 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही जोडी लवकरात लवकर फोडणं गरजेचं आहे.

  • 01 Mar 2026 07:43 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : मस्त रे, वरुणने ओपनिंग जोडी फोडली, शाई होप आऊट, विंडीजला पहिला झटका

    वरुण चक्रवर्ती याने वेस्ट इंडिजची सेट सलामी जोडी फोडून टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. वरुणने विंडीजचा कर्णधार शाई होप याला क्लिन बोल्ड केलं. होपने 33 बॉलमध्ये 32 रन्स केल्या आहेत.

  • 01 Mar 2026 07:26 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Score Updates : काय करतोय हा? अभिषेककडून रोस्टन चेज याला जीवनदान,14 धावांवर कॅच सोडला

    टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने मोठी चूकी केली आहे. अभिषेकने रोस्टन चेज याला जीवनदान दिलं आहे. अभिषेकने चेज याची 14 धावांवर कॅच सोडली. त्यामुळे आता टीम इंडियाला ही चूक किती महागात पडणार हे पहिला डाव आटोपल्यानंतरच समजेल. तसेच टीम इंडियाची या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कॅच सोडण्याची ही 11 वी वेळ ठरली.

  • 01 Mar 2026 07:15 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : विंडीजची संयमी सुरुवात, टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात

    शाई होप आणि रोस्टन चेज या सलामी जोडीने वेस्ट इंडिजसाठी संयमी सुरुवात केली आहे. विंडीजच्या या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये बिनबाद 23 धावा केल्या आहेत. होप 13 आणि चेज 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 01 Mar 2026 07:03 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : सामन्याला सुरुवात, विंडीजची बॅटिंग, सलामी जोडी मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने विंडीजला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. विंडीजकडून कॅप्टन शाई होप आणि रोस्टन चेज ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर अर्शदीप सिंह टीम इंडियाकडून पहिली ओव्हर टाकणार आहे.

  • 01 Mar 2026 06:40 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन

    वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती आणि शामर जोसेफ.

  • 01 Mar 2026 06:39 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

  • 01 Mar 2026 06:35 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध निर्णय काय?

    टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 01 Mar 2026 06:25 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : टी 20I वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम

    शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोवमॅन पॉवेल, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शामर जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, अकेल होसेन, जेडेन सील्स आणि क्वेंटिन सॅम्पसन.

  • 01 Mar 2026 06:24 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : टी 20I वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

    संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

  • 01 Mar 2026 06:19 PM (IST)

    IND vs WI Super 8 T20 WC Live Updates : भारत-विंडीजचं मिशन सेमी फायनल, कोण पोहचणार?

    टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ व्हर्चुअल क्वार्टर फायनलसाठी सज्ज झाले आहेत. हा सामना जिंकणारा संघ टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर आता उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा आणि अंतिम संघ कोणता असणार? हे सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात आज 1 मार्च रोजी यजमान टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचेल. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us