IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये कशी आहे भारताची कामगिरी, जाणून घ्या….

| Updated on: Aug 12, 2022 | 1:07 PM

IND vs ZIM: भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिज मध्ये दमदार प्रदर्शन केलं. वनडे पाठोपाठ टी 20 सीरीज मध्येही एकतर्फी विजय मिळवला. भारताने दोन्ही सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात हरवलं.

IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये कशी आहे भारताची कामगिरी, जाणून घ्या....
ind vs zim
Image Credit source: icc/bcci
Follow us on

मुंबई: भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिज मध्ये दमदार प्रदर्शन केलं. वनडे पाठोपाठ टी 20 सीरीज मध्येही एकतर्फी विजय मिळवला. भारताने दोन्ही सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात हरवलं. टी 20 मध्येही त्यांची वाईट स्थिती केली. आता टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. इथे तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळणार आहे. भारताने या सीरीजसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. कॅप्टनशिपची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर आहे. झिम्बाब्वे मध्ये भारताचे आकडे काय सांगतात, हे सीरीज आधी जाणून घेणं, आवश्यक आहे.

भारताने दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय

झिम्बाब्वे संघाची सध्या जागतिक क्रिकेट मधील कमकुवत संघांमध्ये गणना होते. अलीकडेच या टीमने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा आत्मविश्वास उंचावला असणार. आता भारताच्या युवा खेळाडूंनी भरलेल्या संघावर विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने या सीरीजासाठी आपल्या अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय.

आकडे काय सांगतात?

भारताने सर्वप्रथम 1992 साली झिम्बाब्वेचा दौरा केला. त्या दौऱ्यात भारतीय संघ एक मॅच खेळला व 1-0 ने सीरीज जिंकली. त्यानंतर भारतीय संघ 1996-97 साली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला. त्यावेळी सुद्धा सीरीज 1-0 ने जिंकली. 1998-99 साली भारताने पुन्हा झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात झिम्बाब्वेचा संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. उर्वरित दोन वनडे सामने भारताने जिंकले. तीन वनडे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. त्यानंतर भारताने 2013 साली झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची मालिका खेळला. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली. 2015-2016 मध्ये भारताने पुन्हा झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही वेळा तीन सामन्यांची सीरीज भारताने 3-0 अशी जिंकली. म्हणजे आपल्या घरातच झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध कधी जिंकू शकला नाही.

ओवरऑल हेड टू हेड आकडे

भारत आणि झिम्बाब्वे मध्ये आतापर्यंत एकूण 63 वनडे सामने झाले आहेत. यात भारताची बाजू वरचढ आहे. भारताने 51 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेचा संघ फक्त 10 सामने जिंकू शकला आहे. दोन सामने टाय झाले.