शार्दुलच्या जर्सीवर टेप लावली, त्यानंतर LIVE मॅच मध्ये धवन आपली जर्सी काढत होता, पहा VIDEO

भारताने झिम्बाब्वे (IND vs ZIM) विरुद्ध वनडे सीरीज मध्ये क्लीन स्वीप केलय. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडियाने 13 धावांनी तिसरा वनडे सामना जिंकला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला (Shubhaman Gill) शुभमन गिल.

शार्दुलच्या जर्सीवर टेप लावली, त्यानंतर LIVE मॅच मध्ये धवन आपली जर्सी काढत होता, पहा VIDEO
Shikhar-dhawan
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 23, 2022 | 3:25 PM

मुंबई: भारताने झिम्बाब्वे (IND vs ZIM) विरुद्ध वनडे सीरीज मध्ये क्लीन स्वीप केलय. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडियाने 13 धावांनी तिसरा वनडे सामना जिंकला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला (Shubhaman Gill) शुभमन गिल. त्याने वनडे क्रिकेट मध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर सिकंदर रजाचा सुंदर झेल घेऊन भारताचा विजय पक्का केला. गिलने या सीरीज मध्ये एकूण 245 धावा केल्या. शिखर धवन 154 धावांसह सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

चाहत्याने धवनकडे जर्सी मागितली

तिसऱ्या सामन्यात शिखर धवनने 40 धावा केल्या. शिखर धवनचा या मॅच मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात डगआऊट मध्ये बसलेला धवन स्वत:चे कपडे काढताना दिसतो. जगभरात धवनचे भरपूर चाहते आहेत. झिम्बाब्वे मध्येही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. मॅच दरम्यान धवनच्या एका फॅनने त्याची जर्सी मागितली. 27 व्या ओव्हर मधली ही घटना आहे. धवन आऊट झाल्यानंतर डगआऊट एरिया मध्ये बसला होता. कॅमेऱ्याची नजर धवनच्या एका चाहत्यावर पडली. त्यात एका फलकावर चाहत्याने लिहिलं होतं की, शिखर धवन मला तुझी जर्सी मिळू शकते का?

धवनने शार्दुलची जर्सी घातली होती

शिखर धवनने टीव्हीवर हा मेसेज पाहिल्यानंतर धवनने आपली जर्सी काढण्याची Action केली. धवची ही Reaction पाहून त्याच्याजवळ बसलेले ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान आपलं हसू रोखू शकले नाहीत. धवन तिसऱ्या सामन्यात आपल्या सहकारी फलंदाजाची जर्सी घालून फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने शार्दुल ठाकूरची जर्सी घातली होती. ठाकूरच्या नावावर टेप लावण्यात आली होती. जेणेकरुन ते नाव कोणाला दिसणार नाही.

झिम्बाब्वेने कडवी लढत दिली

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 289 धावा केल्या. गिलने 97 चेंडूत 130 रन्स केले. इशान किशनने 50 अर्धशतकी खेळी केली. झिम्बाब्वेनेही तोडीस तोड टक्कर दिली. झिम्बाब्वेचा संघ जिंकू शकला नाही. यजमान संघ 49.3 षटकात 276 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने 13 धावांनी सामना जिंकला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजाने सर्वाधिक 115 धावा केल्या.