Indian Cricket Team : क्रिकेटच्य मैदानातून वाईट बातमी! टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, खांद्यावर पडल्याची माहिती

| Updated on: Aug 11, 2022 | 9:20 AM

आयपीएल पासून सुंदरने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. आयपीएलमधील सर्व सामनेही तो खेळू शकला नाही. त्यावेळीही त्याचा गोलंदाजीचा हात पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. आता पुन्हा एक संकट आलंय. 

Indian Cricket Team : क्रिकेटच्य मैदानातून वाईट बातमी! टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, खांद्यावर पडल्याची माहिती
क्रिकेटच्य मैदानातून वाईट बातमी
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : भारताला (Indian Cricket Team) लवकरच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र, याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याला (Washington Sundar) पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. हा खेळाडू गेल्या काही काळापासून सतत दुखापतीने त्रस्त आहे. आता त्याचं पुनरागमन अपेक्षित होतं पण नशिबाने पुन्हा एकदा सुंदरला दुखापत झाली. सुंदर रॉयल कपमध्ये लँकेशायरकडून खेळत होता. वूस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात हा तरुण जखमी झाल्याची पुष्टी क्लबने केली. त्याच्या खांद्यावर तो जमिनीवर पडला होता त्यामुळे त्याला खूप त्रास झाला होता. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. आयपीएल (IPL 2022) पासून सुंदरने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. आयपीएलमधील सर्व सामनेही तो खेळू शकला नाही. त्यावेळीही त्याचा गोलंदाजीचा हात पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. यानंतर पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती.

वॉशिंग्टनच्या पुनरागमनाबद्दल बीसीसीआय खूप उत्सुक होते. तो म्हणाला होता, वॉशिंग्टनच्या बाबतीत बोलायचं तर  तो भारताचा नंबर वन फिंगर स्पिनर आहे. त्यामुळे तो कधी परतेल याची प्रतीक्षा होती. त्याला मिळालेले सामने खेळण्यासाठी वेळ हवा होता. मात्र, आता वॉशिंग्टनला परतणे कठीण झाले आहे. यापूर्वी केएल राहुलही या दौऱ्यातून बाहेर होता. आधी राहुल जखमी झाल्याची बातमी आली होती पण नंतर बातमी आली की त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

इशान बाद

इशानने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 14 सामन्यांमध्ये 30.71 च्या सरासरीने आणि 130.30 च्या स्ट्राइक रेटने एकूण 430 धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने संघात आपले स्थान पक्के केले होते. त्याचा बॅकअप सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून वापर केला जात होता, परंतु आशिया कपसाठी केएल राहुलच्या पुनरागमनामुळे इशानला वगळण्यात आले. IPL 2022 मधील इशान किशनच्या कामगिरीबद्दल बोलताना मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर तो लयपासून दूर गेला आणि 14 सामन्यांमध्ये त्याला केवळ 428 धावा करता आल्या. मात्र, त्याची बॅट भारतासाठी जोरदार धावली.

सर्व सामने खेळू शकला नाही

आयपीएल पासून सुंदरने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. आयपीएलमधील सर्व सामनेही तो खेळू शकला नाही. त्यावेळीही त्याचा गोलंदाजीचा हात पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. यानंतर पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली.