बड्या क्रिकेटपटूचे वडील बोलले, त्याला क्रिकेटर केले नसते तर चांगले झाले असते

ravindra jadeja | भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचे काही वाद समोर येत आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां यांच्याशी वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर ते वेगळे झाले. भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांच्यासंदर्भात त्याच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

बड्या क्रिकेटपटूचे वडील बोलले, त्याला क्रिकेटर केले नसते तर चांगले झाले असते
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 7:05 PM

नवी दिल्ली, दि. 9 फेब्रुवारी 2024 | क्रिकेट खेळाडूंच्या मागे खूप मोठे ग्लॅमर असते. क्रिकेट खेळाडूंना भरभक्कम पैसाही मिळत असतो. परंतु भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचे काही वाद समोर येत आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां यांच्याशी वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर ते वेगळे झाले. भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांच्यासंदर्भात त्याच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत. त्याला क्रिकेटर केले नसते तर चांगले झाले असते, असे अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी म्हटले आहे. त्यांनी रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रवींद्र जडेजा याने संबंध तोडले

अनिरुद्ध सिंह गुजरातमधील जामनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये एकटे राहतात. ते म्हणातात, माझा रवी आणि त्याची पत्नी रिवाबा हिच्याशी काहीच संबंध नाही. त्याच्या लग्नाच्या तीन महिन्यानंतर घरात भांडणे सुरु झाली. आता आम्ही एकमेकांकडे जात नाही. रिवाबाने त्याच्यावर जादू केली आहे. त्याचे लग्न झाले नसते तर चांगले झाले असते. तो क्रिकेटर झाला नसता तर चांगले झाले असते. गेल्या पाच वर्षांपासून माझी नातीला मी पहिले नाही. 20 हजाराच्या पेन्शनमध्ये माझे जीवन सुरु आहे. रवींद्र यांच्या जीवनात त्याची सासू जास्त ढवळाढवळ करत असते.

खेळाडू बनवण्यासाठी सुरक्षा रक्षकाचे काम

रवींद्र याला भारतीय लष्कारात दाखल करण्याची माझी इच्छा होती. परंतु त्याचा आईचा आग्रह त्याला क्रिकेटर बनवण्याचा होता. त्याच्यासाठी मी आणि त्याची बहिणीने खूप कष्ट केले. त्याचे कपडे मी धूत होतो. त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी सुरक्षा रक्षकाचे काम मला करावे लागले. परंतु माझ्यापेक्षा जास्त मेहनत त्याची बहिण नयनाबा हिने केली.

हॉटेलवरुन सुरु झाला कुटुंबात वाद

अनिरुद्ध सिंह म्हणतात, आमच्या परिवाराचे एक ‘जड्डूस’ हे हॉटेल आहे. हे हॉटेल मुलगी नयनाबा पाहत आहे. रिवाबा हिला हे हॉटेल तिच्या नावावर हवे होते. त्यावरुन परिवारात भांडण सुरु झाले. त्यानंतर आमचा परिवार तुटत गेला. माझी मोठी मुलगी नयनाबा नसती तर रवींद्र क्रिकेटर बनला नसता. तो १७ वर्षांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने त्याच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली. आईचे प्रेम दिले. तिच्यामुळे तो या ठिकाणी पोहचला आहे.