लॉर्ड्स कसोटी पराभवानंतर भारतीय फलंदाजांना बसला फटका, झालं असं की..
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या प्रत्येक कसोटी सामन्यानंतर आयसीसी गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर यात पुन्हा बदल झाला आहे. भारतीय खेळाडूंचं नुकसान झालं आहे. शुबमन गिलला फटका बसला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील शेवटचे दोन सामने शिल्लक आहेत. मालिका वाचवण्यासाठी भारतावर मोठं दडपण आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला येथून पुढे उर्वरित दोन्ही सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. खरं तर तिसरा कसोटी सामना भारताच्या हातात होता. पण फलंदाजांनी दुसऱ्या डावात खूपच निराशा केली. त्यामुळे भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताला अवघ्या 22 धावांनी पराभवाची धूळ चाखावी लागली. या पराभवासह भारतीय फलंदाजांना मोठा फटका बसला आहे. कारण तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांचं नुकसान झालं आहे.
यशस्वी जयस्वाल दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात 13, तर दुसऱ्या डावात खातं न खोलताच बाद झाला. त्यामुळे त्याच्या क्रमावारीत घसरण झाली आहे. चौथ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. कर्णधार शुबमन गिलची कामगिरी तिसऱ्या कसोटी निराशाजनक राहिली. त्यामुळे त्याला सहाव्या स्थानावर थेट नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. ऋषभ पंतलाही एका स्थानाचं नुकसान झालं आहे. सातव्या स्थानावरून थेट आठव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Test Rankings of Indian players
Before 3rd Test || After 3rd Test
Batting 4 || 5 (Jaiswal) 6 || 9 (Gill) 7 || 8 (Pant) 39 || 34 (Jadeja) 📈 40 || 35 (Rahul) 📈 67 || 73 (Washington) 75 || 77 (Nitish)
Bowling 1 || 1 (Bumrah) 14 || 15 (Jadeja) 22 || 22 (Siraj) 45 ||…
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) July 16, 2025
दुसरीकडे, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना मात्र फायदा झाला आहे. केएल राहुलने 5 क्रमांकानी उडी घेत 40 व्या स्थानावरून 35वं स्थान गाठलं आहे. तर रवींद्र जडेजा यालाही पाच स्थानांचा फायदा झाला आहे. त्यानेही 39 व्या स्थानावरून 34वं स्थान गाठलं आहे. दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरला फायदा झाला आहे. दुसऱ्या डावात त्याने 4 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजी क्रमवारीत 58 व्या स्थानावरून 46व्या स्थानी झेप घेतली आहे.
