IPL 2022: CSK ला मोठा झटका, प्रमुख गोलंदाजाला पायानंतर आता पाठिची दुखापत, संपूर्ण सीजनला मुकणार?

IPL 2022: आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून (CSK) खूपच खराब प्रदर्शन सुरु आहे. सलग चार सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे.

IPL 2022: CSK ला मोठा झटका, प्रमुख गोलंदाजाला पायानंतर आता पाठिची दुखापत, संपूर्ण सीजनला मुकणार?
चेन्नई संघ
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 12, 2022 | 5:22 PM

मुंबई: आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून (CSK) खूपच खराब प्रदर्शन सुरु आहे. सलग चार सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. अजूनही ते आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. चेन्नईची स्पर्धेत सुमार कामगिरी सुरु असताना, आता आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा प्रमुख गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) संपूर्ण सीजनला मुकण्याची शक्यता आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या दुखापतीमधून बरा होण्यासाठी दीपक चाहर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) गेला होता. आता दीपक चाहरला पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे दीपक चाहर संपूर्ण सीजनला मुकण्याची शक्यता आहे. दीपक चाहर एप्रिलच्या अखेरीस चेन्नईकडून खेळण्याची शक्यता होती. पण आता असं होणं कठीण दिसतय. दीपक चाहर श्रीलंका सीरीजमध्येही खेळू शकला नव्हता.

प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता धुसर

दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तो या संघातील दुसरा महागडा खेळाडू आहे. त्याच्या दुखापतीमुळे सीएसकेचं आयपीएलमधील समीकरण बिघडलं. सध्या सीएसकेकडे दुसरा कुठलाही अनुभवी गोलंदाज नाहीय. त्याचा फटका या संघाला बसला आहे. चेन्नईची टीम चारही मॅच हरली असून गुणतालिकेत तळाला आहे. सीएसकेचा संघ पहिल्यांदा आयपीएलमध्ये चार सामने हरला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता धुसर झाली आहे.

दीपक चाहर NCA मध्ये

“दीपक चाहर पाठिच्या दुखण्याच्या समस्येशी सामना करतोय, त्याबद्दल आम्हाला माहित नाहीय. दुखापतीमधून सावरुन चेन्नई संघाकडून खेळण्यासाठी तो कठोर मेहनत करतोय. पण सध्या तो उपलब्ध नाहीय. दीपक चाहर एनसीएमध्ये असून तिथे देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत” असे चेन्नई सुपर किंग्समधील एका सूत्राच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने म्हटलं आहे.