AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG IPL 2022: जिंकण्यासाठी Mumbai Indians चा प्लेइंग 11 मध्ये बदल, वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरला दिली संधी

MI vs LSG IPL 2022: ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (MI vs LSG) सामना सुरु आहे. सलग पाच पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सने आज संघात एक बदल केला आहे.

MI vs LSG IPL 2022: जिंकण्यासाठी Mumbai Indians चा प्लेइंग 11 मध्ये बदल, वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरला दिली संधी
वेस्ट इंडिज फॅबियन एलन मुंबई इंडियन्सकडून डेब्यू Image Credit source: IPL
| Updated on: Apr 16, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (MI vs LSG) सामना सुरु आहे. सलग पाच पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सने आज संघात एक बदल केला आहे. वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर फॅबियन एलनला (fabian allen) आज मुंबई इंडियन्सने संधी दिली आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) दिग्गज खेळाडू कायरन पोलार्डने एलनल डेब्यू कॅप दिली. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या फॅबियन एलनने मुंबईला पहिलं यशही मिळवून दिलय. धुवाधार फलंदाजी करणारा सलामीवीर क्विंटन डि कॉकला त्याने 24 धावांवर पायचीत पकडलं. फॅबियन एलनचं भारताशी खास कनेक्शन आहे. भारताविरुद्धच्या सामन्यातूनच त्याने वनेड आणि टी 20 मध्ये डेब्यू केला आहे. भारतातच हे दोन्ही सामने झाले. पुण्यात ऑक्टोबर 2018 मध्ये एलनने भारताविरुद्ध वनडेत डेब्यू केला. वेस्ट इंडिजने तो सामना 43 धावांनी जिंकला होता. एलन त्या सामन्यात फक्त पाच धावा करु शकला. त्याला एकही विकेट मिळाली नाही.

टी 20 मध्ये कधी डेब्यू केला?

कोलकात्यात चार नोव्हेंबर 2018 रोजी त्याने भारताविरुद्ध टी 20 मध्ये डेब्यू केला. भारताने तो सामना पाच विकेटने जिंकला होता. वेस्ट इंडिजचा संघ आठ विकेट गमावून 109 धावा केल्या. एलनने त्या सामन्यात 20 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या होत्या. त्याला या सामन्यात एकही विकेट काढता आली नव्हती.

टी 20 मध्ये किती धावा केल्या?

26 वर्षाय फॅबियन एलन आतापर्यंत आपल्या करीयरमध्ये 20 वनडे आणि 34 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. वनडे मध्ये सात आणि टी 20 मध्ये 24 विकेट त्याच्या खात्यावर आहेत. त्याशिवाय वनडेमध्ये एका अर्धशतकासह 200 धावा त्याने केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याने 267 रन्स केल्या आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.