RR vs RCB IPL 2022 Qualifier-2: मुंबईने साथ दिली पण RCB कमनशिबी, बटलरची शानदार सेंच्युरी, पहा Highlights VIDEO

| Updated on: May 27, 2022 | 11:53 PM

RR vs RCB IPL 2022 Match Result: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL Qualifier 2) क्वालिफायर 2 चा सामना खूपच एकतर्फी झाला. राजस्थान रॉयल्सने RCB ने दिलेलं 158 धावांच लक्ष्य आरामात पार केलं.

RR vs RCB IPL 2022 Qualifier-2: मुंबईने साथ दिली पण RCB कमनशिबी, बटलरची शानदार सेंच्युरी, पहा Highlights VIDEO
RR Beat RCB in Qualifier 2
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL Qualifier 2) क्वालिफायर 2 चा सामना खूपच एकतर्फी झाला. राजस्थान रॉयल्सने RCB ने दिलेलं 158 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. आधी राजस्थानच्या गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे जोस बटलरने (Jos Buttler) विजयी नायकाची आपली भूमिका पार पाडली. जोस बटलरने शानदार शतक झळकावलं. राजस्थानने सात विकेट राखून RCB वर विजय मिळवला. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 6 षटकार होते. बटलरने षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोस बटलरचं या सीजनमधलं हे चौथ शतक आहे. त्याच्या खात्यावर चार अर्धशतकही जमा आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलर पहिल्या स्थानावर असून त्याच्या 818 धावा झाल्या आहेत.

जोस बटलरची क्लासिक सेंच्युरी इथे क्लिक करुन पहा

पावरप्लेमध्ये सुरुवातच जोरदार

फायनलमध्ये राजस्थानचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. राजस्थानने सुरुवातच जोरदार केली. पावरप्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्समध्येच 60 धावांचा टप्पा पार केला. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जैस्वाल 21 धावांवर आऊट झाला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना कव्हर्समध्ये विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसनने सुद्धा नेहमीच्या आक्रमक शैलीत धावा केल्या. 23 धावांवर वानिंन्दु हसरंगाच्या गोलंदाजीवर फटेकबाजी करण्याच्या नादात तो यष्टीचीत झाला. सॅमसनने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले.

याआधी राजस्थानची टीम कधी फायनलमध्ये पोहोचली होती?

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमने-सामने असतील. राजस्थानच्या टीमने याआधी 2008 मध्ये म्हणजे आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये जेतेपद पटकावलं होतं. आता दुसऱ्यांदा त्यांनी आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.

6,6,4 बँगलोरच्या गोलंदाजांना बटलरने कसं धुतलं, ते इथे क्लिक करुन पहा

RCB चे सगळे स्टार फेल

मुंबई इंडियन्समुळे RCB ची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. एलिमिनेटरमध्ये त्यांनी लखनौ सुपर जायंट्सला नमवून क्वालिफायरमध्ये प्रवेश केला होता. पण आज त्यांना चॅम्पियनसारखा खेळ करता आला नाही. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक या मोठ्या खेळाडूंकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण ते सपशेल फेल ठरले. त्यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट (7), डू प्लेसिस (25), मॅक्सवेल (24) आणि कार्तिक (6) धावांवर आऊट झाला. आजही रजत पाटीदारच संकटमोचक ठरला. त्याने 42 चेंडूत 58 धावा फटकावल्या. त्याच्यामुळेच RCB ला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला.