IPL 2022 Retention Live Stream: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं रिटेंशन कधी, कुठे आणि कसं पाहणार?

आयपीएलचा 15 हंगाम क्रिकेटरसिंकासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या हंगामात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम आयपीएलच्या 15 पर्वात आपल्याला पाहायला मिळतील.

IPL 2022 Retention Live Stream: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं रिटेंशन कधी, कुठे आणि कसं पाहणार?
IPL 2022 Retention Live Stream

IPL 2022 Retention नवी दिल्ली : आयपीएलचा 15 हंगाम क्रिकेट रसिंकासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या हंगामात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम आयपीएलच्या 15 पर्वात आपल्याला पाहायला मिळतील. कोलकाता येथील व्यावसायिक संजीव गोयंका यांनी लखनऊच्या टीमची प्रेंचाईजी घेतलीय. त्यांच्या आरपीएसजी ग्रुपनं 7090 कोटी रुपयांची बोली लावत ही फ्रेंचाईजी घेतली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय इक्विटी इनवेस्टमेंट फर्म सीवीसी कॅपिटलनं अहमदाबादच्या टीमची फ्रेंचाईजी 5600 कोटी रुपयांना घेतलीय. या पार्श्वभूमीवर जुन्या 8 टीम्सना त्यांच्याकडील खेळाडू रिटेन करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. जुन्या आठ टीमकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा आज सांयकाळी होणार आहे.

आयपीएल 2022 साठी रिटेंशन कधी होणार?

आयपीएल 2022 साठी खेळाडू रिटेन करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती.

आयपीएल 2022 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा कधी होणार?

आयपीएल 2022 साठी आठ टीम रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा 30 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 5 वाजता करतील.

आयपीएल 2022 साठी रिटेंशन लाईव्ह टेलिकास्ट कुठं पाहता येणार?

आयपीएल लाईव्ह रिटेंशन कार्यक्रमाचं टेलीकास्ट स्टार स्पोर्टसे नेटवर्कच्या चॅनेलवर होणार आहे. याशिवाय रिटेनशनच्या अपडेटस टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील.

आयपीएल 2022 रिटेशन प्रोग्रामचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहायला मिळेल?

हॉटस्टारवर आयपीएलच्या 15 हंगामासाठीचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 टीम

आयपीएलच्या 15 व्या एडिशनमध्ये 10 टीम सहभागी होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंचं ऑक्शन होण्यापूर्वी रिटेंशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ही प्रक्रिया मंगळवारी म्हणजेच आज पूर्ण होईल. आयपीएलमधी जुन्या आठ टीम्सना त्यांच्याकडील चार खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यामध्ये प्रत्येक टीम 2 ते 3 परदेशी खेळाडू रिटेन करु शकते. ही मुदत आज संपणार आहे.

रिटेंशननंतर अहमदाबाद आणि लखनऊला संधी

आयपीएलमधील जुन्या आठ टीमची रिटेंशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहमदबाद आणि लखनऊ या संघांना 25 डिसेंबरपर्यंत तीन खेळाडूंची निवड करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्या त खेळाडूंचा लिलालव होणार आहे. काही टीम त्यांच्याकडील महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन करण्याची शकय्ता आहे.

इतर बातम्या:

Ipl : आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याचा स्पप्नभंग होणार? अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन?

आफ्रिकन देशांसाठी भारताचं मोठं पाऊल, केविन पीटरसनही भारावला, भारतीयांचं कौतुक करत नरेंद्र मोदींचे मानले आभार

Published On - 8:58 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI