IPL 2022 RR vs RCB: राजस्थान विरुद्ध बँगलोर मॅच, आज अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? जाणून घ्या Pitch Report

| Updated on: May 27, 2022 | 4:21 PM

IPL 2022 RR vs RCB: मुंबईने लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. त्यामुळे RCB चा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. एलिमिनेटर राऊंडमध्ये आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवून क्वालिफायर 2 साठी पात्र ठरले.

IPL 2022 RR vs RCB: राजस्थान विरुद्ध बँगलोर मॅच, आज अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? जाणून घ्या Pitch Report
बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे.
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) या दोन टीममध्ये आज IPL 2022 मधला क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) ही मॅच होणार आहे. लीग स्टेजमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ 14 सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्सने 9 सामने जिंकलेत, 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचे 18 पॉइंट्स होते. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 8 सामने जिंकलेत. 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचे 16 पॉइंट्स होते. पॉइंट्स टेबलमध्ये ते चौथ्या स्थानावर होते. मुंबईने लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. त्यामुळे RCB चा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. एलिमिनेटर राऊंडमध्ये आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवून क्वालिफायर 2 साठी पात्र ठरले.

क्वालिफायर आणि एलिमिनेटर राऊंड

क्वालिफायर 1 च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 188 धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरने 89 धावांची खेळी केली होती. कॅप्टन संजू सॅमसनने 47 धावा फटकावल्या होत्या. गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या 40 धावा आणि मिलरची 38 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज खेळी, त्या बळावर गुजरातने हा सामना जिंकला. एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला.

पावसाची शक्यता किती?

आज अहमदाबाद शहरात तापमान 42 अंश सेल्सिअस असेल. दिवसा काही प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. रात्री आकाश निरभ्र असेल. दिवसा आणि रात्रीच्यावेळी पावसाची शक्यता फक्त 3 टक्के आहे.

पीच रिपोर्ट

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. टी 20 सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये सरासरी टोटल 174 आहे. दुसऱ्या डावात 166 आहे. आज राजस्थान आणि बँगलोरच्य़ा टीममध्ये आयपीएल 2022 मधला पहिला सामना इथे होत आहे.