
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 17 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा त्यांच्याच घरात शेवटच्या चेंडूवर 3 धावांनी पराभव केला. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 172 धावाच करता आल्या. आपल्या होम टीम विरुद्ध खेळणाऱ्या लोकल बॉय ऑलराउंडर आर अश्विन याने राजस्थानच्या विजयात निर्णायत भूमिका बजावली. अश्विन याने आधी बॅटिंग करताना 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 चौकाराच्या मदतीने 30 धावांची खेळी केली. बॉलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मात्र त्यानंतर अश्विन याच्यासाठी वाईट बातमी आली आहे.
अश्विन याने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याचवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अश्विनने आयपीएलच्या आचार सहिंतेच्या 2.7 च्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे अश्विन याला एका सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के इतकी रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे.
आता अश्विन याने असं काय केलं की त्याला दंड ठोठावण्यात आला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण आता अश्विनची नक्की चूक काय होती, त्यांनी नक्की काय केलं, हे सविस्तर जाणून घेऊयात. अश्विन याने पंचांविरोधात विधान केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पंचांनी या सामन्यादरम्यान न विचारता बॉल बदलल्याचा आरोप अश्विनने केला. अश्विनने यावरुनच मैदानात आक्षेप घेतला. जुन्या बॉलवरुन टीमला काही आक्षेप नव्हता. मात्र त्यानंतरही बॉल बदलल्याने अश्विनने हरकत घेतली आणि त्याच्यावर अखेर ही कारवाई झाली.
दरम्यान राजस्थानने चेन्नईला पराभूत करत पॉइंट्सटेबलमध्ये अव्वलस्थानी झप घेतली. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नई 6 पॉइंट्ससह +1.588 या नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान राजस्थान आपला पुढील सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध 16 एप्रिल रोजी खेळणार आहे. राजस्थानचा या सामन्यात विजय मिळवण्याचा मानस असणार आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) | संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), सिसांडा मगला, महेश थिक्षाना, तुषार देशपांडे आणि आकाश सिंग.