IPL 2023 | रोहित शर्मा याचा आयपीएलच्या काही तासांआधी मोठा निर्णय?

| Updated on: Mar 30, 2023 | 6:21 PM

आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार रोहित शर्मा हा मोठा निर्णय....

IPL 2023 | रोहित शर्मा याचा आयपीएलच्या काही तासांआधी मोठा निर्णय?
Follow us on

मुंबई | पाहता पाहता आयपीएल 16 व्या मोसमाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या 16 व्या हंगामाची सुरुवात येत्या 31 मार्चपासून होतेय. सर्व खेळाडू, टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. पर्वातील सलामीचा सामना हा गतविजेत्या गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी ग्रँड ओपनिंग सेरेमनी अर्थात रंगारंग कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते आणि अभिनेत्र्या परफॉर्मन्स करणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं 2013 पासून नेतृत्व करतोय. यासह तो ओपनिंग बॅट्समनची जबाबदारीही निभावतोय. रोहितला ओपनिंग करताना पाहणं हे फक्त क्रिकेट चाहत्यांनाच नाही, तर दिग्गज क्रिकेटपटूंनाही आवडतं. या दरम्यान टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचे माजी मेन्टॉर अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. कुंबळे यांनी रोहितबाबत क्रिकेटचाहत्यांसोबत खूप काही शेअर केलंय.

“रोहित याची 2013 साली मुंबईच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून रोहित निर्भिड आहे. तो आपलं मत मांडायला घाबारायचा नाही. आपलं मत काय आहे, हे सांगण्यासाठी रोहित सिनिअर खेळाडूंपर्यंत जायचा. तसेच स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायचा. एक कर्णधाराकडून अशीच अपेक्षा असते”, असं कुंबळे यांनी म्हटलंय.

“रोहितच्या नेतृत्वात मुंबई यशस्वी ठरलीय. याचा अर्थ असा नाही की तो बॅट्समन म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही. माझ्यानुसार रोहितने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करायला हवी. तो त्या क्रमांकावरही जबरदस्त फटकेबाजी करु शकतो”, असा विश्वास कुंबळे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान आता रोहित कुंबळे यांचा सल्ला ऐकून चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणार की जसं सुरु आहे तसंच सुरु ठेवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

रोहित यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस आणि जोफ्रा.