AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT : पलटण कोणाचंच उधार ठेवत नाही, गुजरात टायटन्सवर मिळवला विजय

गुजरातच्या सलग पाच विजयांना मुंबईने ब्रेक लावला आहे. या विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

MI vs GT : पलटण कोणाचंच उधार ठेवत नाही, गुजरात टायटन्सवर मिळवला विजय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 12, 2023 | 11:49 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना सूर्याच्या नाबाद 103 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 218 धावांचां डोंगर उभा केला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला 20 षटकात 191-8 धावाच करता आल्या. गुजरातच्या सलग पाच विजयांना मुंबईने ब्रेक लावला आहे. राशिद खानेने शेवटला आक्रमक 79 धावांची खेळी करताना 10 सिक्सर मारत पूर्ण प्रयत्न केला मात्र तो विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकदम  खराब सुरूवात झाली. रिद्धिमान साहा 2 धावा, हार्दिक पांड्या 6 धावा, शुबमन गिल 4 धावा, विजय शंकर 29 धावा, अभिनव मनोहर 2 धावा आणि राहुल तेवतिया 14 धावा हे महत्त्वाचे खेळाडू अपयशी ठरले. डेव्हिड मिलर 44 धावा आणि राशीद खानची 79 धावांची खतरनाक खेळीच्या जोरावर गुजरातला 200 धावांच्या जवळपास जात आलं. राशिद खान याने एकट्याने 10 सिक्सर मारले. अखेर मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला असून तिसऱ्या स्थानी विराजमान होत प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

Follow Us
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?