AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Orange and Purple Cap | मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी विजय, ऑरेन्ज-पर्पल कॅप कुणाकडे?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | आयपीएल 16 व्या मोसमात आता एक एक सामना निर्णायक आहे. अशात पॉइंट्स टेबलसह ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे, याकडेही क्रिकेट चाहते बारीक लक्ष ठेवून आहेत.

IPL 2023 Orange and Purple Cap | मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी विजय, ऑरेन्ज-पर्पल कॅप कुणाकडे?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 13, 2023 | 12:28 AM
Share

मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने गुजरात टायटन्स टीमवर 27 धावांनी विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाउल पुढं टाकलंय. तर गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आणखी प्रतिक्षा पाहण्यास भाग पाडलंय. इतकंच नाही, मुंबईने गुजरातवर मात करत गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपाही घेतला. मुंबईने गुजरातला विजयासाठी सूर्यकुमार यादव याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 219 धावांचं आव्हान दिलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 218 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 49 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 11 चौकारांसह नॉट आऊट 103 धावा केल्या. तर राशिद खान याने मुंबईच्या 4 फलंदाजांना आऊट केलं.

त्यानंतर 219 धावांचं पाठलाग करायला आलेल्या गुजरातला मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने धक्के दिले. त्यामुळे गुजरातची 13.2 ओव्हरमध्ये 8 बाद 103 अशी स्थिती झाली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला असं वाटत होतं. मुंबईला मोठ्या फरकासह विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्यील नेट रन रेट सुधारण्याची संधी होती. मात्र राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांना सपशेल रडवलं.

राशिद खान याने अल्जारी जोसेफ याच्या मदतीने नवव्या विकेटसाठी नाबाद 88 धावांची नाबाद भागीदारी केली. राशिदला गुजरातला विजयी करता आलं नाही, मात्र त्याने पराभवातील धावांचा फरक कमी केला, ज्यामुळे मुंबईला विजयानंतर विशेष फायदा होऊ शकला नाही. राशिदने बॉलिंगसह धमाका केल्यानंतर बॅटिंगने विस्फोटक खेळी केली.

राशिदने 32 बॉलमध्ये नाबाद 79 धावांची खेळी केली. राशिद या सामन्यात गुजरातकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. राशिद याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.

ऑरेन्ज कॅप कुणाची?

सूर्यकुमार यादव याने नॉट आऊट 103 धावांच्या शतकी खेळीसह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीतील पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत धडक मारली आहे. ऑरेन्ज कॅप फाफ डु प्लेसिस याच्याकडे कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी जयस्वाल आहे. मात्र सूर्याने थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. यामुळे गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याची चौथ्या, तर सीएसके च्या डेव्हॉन कॉनवे याची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झालीय. तर विराट कोहली पहिल्या 5 फलंदाजांमधून बाहेर पडलाय. विराट सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

राशिद खान याने मुंबई विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने युझवेंद्र चहल याला मागे टाकत पर्पल कॅप पटकावली. राशिदच्या नावावर आता एकूण 23 विकेट्सची नोंद झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 4 विकेट्स घेत ही कॅप मिळवली होती. मात्र ती कॅप एक दिवसापेक्षा फार काळ कायम राखण्यात यश आलं नाही.

राशिदने पछाडल्यानं युझवेंद्र दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. चहलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाल्याने त्याचा फटका मोहम्मद शमी याला बसला. शमी दुसऱ्यावरुन चौथ्या क्रमांकावर आला. तसेच पीयूष चावला याने गुजरातच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे पीयूष पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर तुषार देशपांडे चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि कुमार कार्तिकेय.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल