AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल कॅप ‘या’ बॉलरने हिसकावली, ऑरेन्ज कॅप कोण मिळवणार?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | आता आयपीएल 16 व्या सिजनमध्ये रायव्हलरी वीकला सुरुवात झालीय. या रायव्हलरी वीकच्या पहिल्या दिवसातच गोलंदाजाने पर्पल कॅप मिळवली आहे.

IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल कॅप 'या' बॉलरने हिसकावली, ऑरेन्ज कॅप कोण मिळवणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 07, 2023 | 1:13 AM
Share

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या हंगामात शनिवारी 6 मे रोजी 2 सामने पार पडले. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर 6 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसरा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. दिल्लीने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या दोन्ही सामन्यात अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंना ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगला फायदा झाला. कुणी पहिल्या स्थानी झेप घेत कॅप पटकावली. तसेच कुणी चांगली कामगिरी करत आपलं स्थान भक्कम केलं तर कुणी पहिल्या पाचात धडक मारली. या दोन्ही सामन्यानंतर या ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कुणाला फायदा कुणाला तोटा झालाय, हे देखील आपण जाणून घेऊयात.

ऑरेन्ज कॅपमधील हालचाली

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याने दिल्ली विरुद्ध 45 धावा केल्या. फाफने 45 धावांसह पहिलं स्थान आणखी भक्कम केलंय. चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 44 रन्स ठोकल्या. कॉनवेने यासह यशस्वी जयस्वाल याला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे यशस्वी तिसऱ्या स्थानी घसरला. आरसीबीच्या विराट कोहली याने दिल्ली विरुद्ध 55 धावा करत पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी झेप घेतलीय. त्यामुळे शुबमन गिल हा थेट चौथ्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी फेकला गेलाय. तर मुंबई विरुद्ध 30 धावा ठोकल्याने चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याची सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी एन्ट्री झालीय.

ऑरेन्ज कॅप

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

पर्पल कॅपने डोकं बदललं

शनिवार 6 मे च्या डबल हेडरनंतर पर्पल कॅपमध्ये मोठा उलटफेर झालाय. चेन्नई सुपर किंग्सच्या तुषार देशपांडे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या. तुषारने यासह पर्पल कॅप पुन्हा मिळवली. तुषारच्या नावावर 19 विकेट्स झाल्या आहेत. तुषार यासह मोहम्मद शमी याला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. त्यामुळे शमीची दुसऱ्या आणि राशिद खान याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला याने चेन्नईच्या 2 फलंदाजांना बाद केल्याने त्याची पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी एन्ट्री झालीय. परिणामी पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह हा पाचव्या क्रमांकावर आलाय.

पर्पल कॅपू

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान