AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 PK vs DC : बेफिकर धवन! चित्यासारखा पळाला आणि डाय मारत… गब्बरचा कडक कॅच!

Shikhar Dhawan Catch Video : पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने अफलातून झेल घेतला आहे. या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

IPL 2023 PK vs DC : बेफिकर धवन! चित्यासारखा पळाला आणि डाय मारत... गब्बरचा कडक कॅच!
| Updated on: May 17, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावा केल्य आहेत. रिली रोसो याच्या नाबाद 82 धावा आणि पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या  जोरावर दिल्लीने 200 धावांचा टप्पा पार केला. या सामन्यामध्ये दिल्लीचा कर्णधार वॉर्नरचं अर्धशतक हुकलं त्याला कारण ठरला तो पंजाबचा कर्णधार शिखर धवन.

या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ आले. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 10.2 षटकांत 94 धावा जोडल्या. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शानदार खेळी केली. त्याने 31 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावांची खेळी केली.

11 व्या ओव्हरमध्ये पंजाबला पहिली विकेट मिळाली, डेव्हिड वॉर्नर क्रीझवर असताना त्याला सॅम करनने स्लो बॉल टाकला. यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू उंच उडाला, कव्हर्सवर क्षेत्ररक्षण करणार्‍या शिखर धवन धावत गेला आणि डाईव्ह टाकत झेल घेतला. गब्बरने हा कॅच घेतल्यामुळे वॉर्नरचं आजच्या सामन्यात अर्धशतक हुकलं.

पाहा व्हिडीओ-

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.