
मुंबई : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने स्लो सुरुवात केली. पण अखेरीस त्यांना हरवलेला सूर सापडला आहे. मुंबई इंडियन्सने काल गतविजेत्या गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय मिळवला. मागच्या पाच सामन्यातील मुंबई इंडियन्सचा हा चौथा विजय आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबी इंडियन्सची टीम तिसऱ्या स्थानावर आहे.
12 सामन्यात मुंबई इंडियन्सचे आता 14 पॉइंट्स झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये खेळण्याच्या अपेक्षांना सुद्धा मोठं बळ मिळाल आहे. मुंबईच्या पुढे फक्त गुजरात आणि चेन्नईची टीम आहे. मुंबईकडून पराभव झाला, तरी गुजरातची टीम 12 सामन्यात 16 पॉइंट्ससह टॉपवर आहे. सीएसकेची टीम तितकेच सामने खेळून 15 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात, CSK साठी प्लेऑफची स्थिती काय?
गुजरात टायटन्सची टीम जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचलीय. उर्वरित दोन सामने जिंकले, तर पॉइंट्स टेबलमध्ये त्यांच पहिलं किंवा दुसरं स्थान निश्चित होईल. जर त्यांना दोन्ही सामने जिंकता आले नाहीत, तर मात्र परिस्थिती थोडी बदलेल. चेन्नई सुपर किंग्सची सुद्धा अशीच स्थिती आहे.
मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे चान्सेस किती?
मुंबई इंडियन्सचे दोन सामने बाकी आहेत. ते 18 पॉइंट्सपर्यंत मजल मारु शकतात. उर्वरित दोन सामन्यात जय-पराजयामुळे प्लेऑफच्या ड्राम्यात अजून वाढ होईल. मुंबईने एक सामना जिंकला आणि दुसरा सामना हरला, तर त्यांना 16 पॉइंट्सवर समाधान मानावे लागेल. तीन टीम्सचे 10 पॉ़इंट्स आहेत. राजस्थान आणि एलएसजीचे अनुक्रमे 12 आणि 11 पॉइंट्स आहेत. त्यामुळे दररोज प्लेऑफ शर्यची अजून इंटरेस्टिंग बनत जाणार आहे.
| संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
|---|---|---|---|---|---|
| गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
| चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
| लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
| मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
| राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
| आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
| केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
| पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
| दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
| सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी सहा सामने जिंकलेत, सहा सामने गमावलेत. राजस्थानला आपले उर्वरित दोन सामने जिंकावेच लागतील, तरच ते 16 पॉइंट्सपर्यंत पोहोचू शकतात.
दोघे जिंकले तर राजस्थानला फटका
लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही टीम्सचे प्रत्येकी तीन सामने बाकी आहेत. LSG ने सर्व सामने जिंकले, तर त्यांचे 17 आणि RCB चे 16 पॉइंट्स होतील. लखनौ आणि बँगलोरने आपले सर्व उर्वरित सामने जिंकले, तर निश्चितच राजस्थान रॉयल्सला त्याचा फटका बसेल.