Arjun Tendulkar | अर्जुननं लक्ष्य भेदलंच, अटीतटीच्या सामन्यात निर्णायक गोलंदाजी, मुंबई विजयी

| Updated on: Apr 19, 2023 | 5:08 PM

आयपीएलमध्ये दुसऱ्या डावात शेवटची ओव्हर टाकण्याचा दबाव हा भल्या भल्या अनुभवी गोलंदाजांना झेपत नाही. मात्र अर्जुन तेंडुलकर याने दुसऱ्या सामन्यातच 20 धावांचा शानदार बचाव केला. भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं आणि मुंबईला विजयही मिळवून दिला.

Arjun Tendulkar | अर्जुननं लक्ष्य भेदलंच, अटीतटीच्या सामन्यात निर्णायक गोलंदाजी, मुंबई विजयी
Follow us on

हैदराबाद | मुंबई इंडियन्स टीमने सनरायजर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सचा हा आयपीएल 16 व्या मोसमातील 5 व्या सामन्यातील सलग तिसरा विजय ठरला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकर याने शेवटच्या ओव्हर टाकली. अर्जुनने या ओव्हरमध्ये हैदराबादची दहावी आणि वैयक्तिक पहिली विकेट घेतली. अर्जुनने घेतलेल्या विकेटमुळे हैदराबाद ऑलआऊट झाली.  अर्जुनने भुवनेश्वर कुमारा याला रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. अशाप्रकारे मुंबईला विजय मिळवून दिला. अर्जुनने भुवनेश्वर कुमार याला आऊट करत आयपीएल कारकीर्दीतील पहिलीवहिली विकेट मिळवली.

शेवटच्या ओव्हरचा थरार

हैदराबादला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता होती. कॅप्टन रोहित शर्मा याने अर्जुन तेंडुलकरला ओव्हर सोपवली.अर्जुनने पहिला बॉल समदला डॉट टाकला, वाईट यॉर्कर असल्याने हा चेंडू इशान किशनने अडवला नसता तर चौकारच असता. दुसरा बॉलवर 2 धावा घेताना समद रनआऊट झाला. त्यानंतर 4 बॉलमध्ये 19 धावांची असा सामना आला. मात्र अर्जुन तेंडुलकरने वाईड चेंडू टाकला आणि एक धाव मिळाली. त्यानंतर 4 चेंडू 18 अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर मार्केंडयन 2 धावा घेतला. तेव्हा 3 चेंडू 16 अशा धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर 1 धाव मिळाली आणि विजय निश्चित झाला. पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार बाद झाला आणि संपूर्ण संघ ऑलआउट झाला.

अर्जुनची पहिली विकेट

अर्जुन तेंडुलकर याची पहिली प्रतिक्रिया

“मला आयपीएलमध्ये पहिली विकेट मिळाली. मला ओव्हर टाकण्यासाठी बॉल दिल्यानंतर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. मी चेंडू लांब ठेवत होतो यामुळे बॅट्समनला लाँग साइडला मारायला भाग होतं. मला गोलंदाजी आवडते, कॅप्टनने मला बॉलिंग करण्यास सांगितले. तेव्हा मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच झालं. सचिन तेंडुलकर आणि मी क्रिकेटबद्दल बोलतो, आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो. मी फक्त चेंडू टाकण्यावर लक्ष केंद्रित केलं.”, अशी प्रतिक्रिया अर्जुनने सामन्यानंतर दिली.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शौकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.