AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : पॉइंट टेबलवर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाला, “आमचा संघ..”

IPL RCB vs PBKS : आयपीएल इतिहासात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. त्यात यंदाच्या स्पर्धेत सुरुवात चांगली झाली तरी मध्येच डाव अडखळला. आता यावर विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

IPL 2023 : पॉइंट टेबलवर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाला, आमचा संघ..
IPL 2023 : गुणतालिकेवरून विराट कोहलीचं डोकं फिरलं! विजयानंतर स्पष्टच म्हणाला...Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 20, 2023 | 9:12 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत आता गुणांसाठी सर्वच संघांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सोडला तर सर्वच या शर्यतीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक विजय आणि पराभव गुणतालिकेचं गणित बिघडवत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासह खात्यात सहा गुणांची कमाई झाली. तसेच पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे या सामन्याचं नेतृत्व विराट कोहलीने केलं. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर त्याने गुणतालिकेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाला विराट कोहली?

“गुणतालिका तुमच्या संघाचं अस्तित्व परिभाषित करू शकत नाही. आम्ही आताशी पाच ते सहा सामने खेळलो आहोत. आम्ही साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत प्रयत्नशील असू. त्यामुळे आम्हाला काय अपेक्षित आहे यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. फाफने चांगली फलंदाजी केली. तर गोलंदाजांनी त्यांना रोखलं हे विशेष बाब आहे. कारण गोलंदाजांना लक्ष्य पुरेसं असल्याचं सांगितलं होतं. पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स घेतल्यानंतर दबाव वाढला होता आणि सामना आमच्या बाजून झुकला.”, असं विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने संघाला सावध सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या. बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं.

विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवातील झटपट विकेट्स गमावल्या. प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा सोडलं तर एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण 18.2 षटकात 150 धावांवर बाद झाला. बंगळुरुने पंजाबवर 24 धावांनी मात मिळवली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण