
मुंबई | आयपीएल 17 व्या हंगामाची 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर महेंद्रसिंह धोनी हाच सीएसकेचा कॅप्टन असणार आहे. मात्र त्याआधी सीएसकेला मोठा झटका लागला आहे. सीएसकेचा स्टार गोलंदाज हा दुखापतीमुळे आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलमध्ये चेन्नईसाठी खेळणाऱ्या मथीशा पथिराणा याला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे 4-5 आठवडे खेळता येणार नसल्याचं समजतंय. मथीशा याला 6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मथीशाला त्यानंतर त्याच्या खात्यातील पू्र्ण ओव्हरही टाकता आल्या नाहीत. मथीशाला झालेली दुखापत ही लेव्हल 1 ची आहे. मथीशाला या दुखापतीतून बरं होण्यासाठी 2-3 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे मथीशा पहिल्या टप्प्यातून बाहेर पडल्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मथीशाने सीएसकेसाठी गेल्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मथीशाने 12 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेत सीएसकेला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. मथीशा याच्याआधी सीएसकेला मोठा झटका लागला. सीएसकेसाठी खेळणारा न्यूझीलंडचा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनव्हे याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात खेळता येणार नाही. डेव्हॉनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती.
चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका
PATHIRANA SET TO MISS THE START OF THE IPL 2024…!!! [Espn Cricinfo]
– Big loss for CSK. pic.twitter.com/5eyzqqDBUc
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2024
आयपीएल 2024 साठी सीएसके टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड़, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिज़वी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.