
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला. पण चेपॉकच्या मैदानावर गुजरातच्या गोलंदाजांचं फारसं काही चाललं नाही. रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेने गोलंदाजांची पाठ फोडली. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र, तर शिवम दुबे आणि डेरिल मिचेल यांच्यात अर्धशतकी खेळी झाली. तर शिवम दुबेने झंझावती अर्धशतकी खेळी केली. शिवम दुबेने 22 चेंडूत 51 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून राशीद खान 4 षटकात 49 धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात रचिन रवींद्रचं वादळी खेळी अनुभवायला मिळाली. गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. पॉवर प्लेमध्ये कोणत्याच गोलंदाजांचं त्याच्यासमोर चाललं नाही. ऋतुराज गायकवाड-रचिन रवींद्र यांच्यात 27 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. रचिन रवींद्रचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. 20 चेंडूत 46 धावा करून रचिन रवींद्र बाद झाला. राशीदच्या फिरकीत गुंतला आणि स्टंपिंग झाला. चेन्नईच्या 104 धावा असताना दुसरी विकेट गेली. अजिंक्य रहाणे 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. ऋतुराज गायकवाडच्या रुपाने तिसरा धक्का बसला. 36 चेंडूत 46 धावा करून बाद झाला.
शिवम दुबे 23 चेंडूत 51 धावांची खेळी खेळून बाद झाला. शिवम दुबेने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यानंतर आलेल्या समीर रिझवी 6 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यात त्याने 2 षटकार मारले.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन