
आयपीएलचा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू होणार आहे. हा सामना चेन्नईमध्येच चिदंबरम मैदानावर होणार असून दोन्ही संघांचा स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स मधील सामना सुरू व्हायला अवघी काही मिनिटे बाकी आहेत. सामन्याचा टॉस झाला असून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 किंवा इतर कुठे टीम लावत असाल तर त्यामध्ये एका खेळडूला नक्की घ्या. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे.

ऋतुराज गायकवाड याची गुजरातविरूद्धची कामगिरीवर नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल. गायकवाड याने 73 (48), 53 (49), 92 (50), 60 (44), 26 (16) धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (WK), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान